सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेसच्या मोठा अपघात टळला; दोन डबे निसटले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bidar express bogie

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार स्थानकाजवळ बुधवार रात्री ९.३० वाजताच्या सुमारास सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेसचे दोन डबे निसटल्याने मोठा अपघात होताहोता थोडक्यात बचावला आहे.

सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेसच्या मोठा अपघात टळला; दोन डबे निसटले!

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार स्थानकाजवळ बुधवार रात्री ९.३० वाजताच्या सुमारास सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेसचे दोन डबे निसटल्याने मोठा अपघात होताहोता थोडक्यात बचावला आहे. ही घटना क्लिपच्या तांत्रिक बिघाडामुळे घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेस ही सीएसएमटीहून रात्री ९ वाजता निघालेली ट्रेन कुर्ला रेल्वे स्थानक ओलांडत असताना विद्याविहार स्थानकाजवळ ही घटना घडली. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, अज्ञात कारणांमुळे, ट्रेनचा सीएसएमटी- बिदर एक्स्प्रेसच्या इंजिनपासून तिसरा आणि दुसरा जोडले गेले नाहीत आणि दोन पुढचे डबे उर्वरित ट्रेनपासून वेगळे झाले आहे. ही घटना लक्षात येताच न जोडलेले डबे पुन्हा जोडण्यात आले आणि रात्री १०.२० वाजता ट्रेन परतीच्या प्रवासाला लागली. ही घटना रात्री 9.30 च्या सुमारास घडली आणि लवकरच ट्रॅकवर रक्षकांना पाचारण करण्यात आले. सुमारे ४० मिनिटांत गाडी पुन्हा जोडण्यात आले आणि बिदर एक्स्प्रेसला नियोजित प्रवासासाठी पाठवण्यात आले. तसेच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

Web Title: Csmt Bidar Express Two Bogie Escape

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :railwayCSMT