सीएसएमटी ते दिल्ली Rajdhani Express दररोज धावणार; प्रवाशांना दिलासा

कुलदीप घायवट
Wednesday, 13 January 2021

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते दिल्ली येथे जाणारी राजधानी एक्‍स्प्रेस 19 जानेवारीपासून दररोज धावणार आहे.

मुंबई  : मध्य रेल्वे ( Indian Railway ) मार्गावरील सीएसएमटी ते दिल्ली येथे जाणारी राजधानी एक्‍स्प्रेस 19 जानेवारीपासून दररोज धावणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली मध्य रेल्वेची राजधानी एक्‍स्प्रेस 30 डिसेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे; मात्र मध्य रेल्वेची  ( central railway )राजधानी एक्‍स्प्रेस आठवड्यातून फक्त चार दिवस धावत आहे. "राजधानी'ला प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि मागणीनुसार मध्य रेल्वेकडून राजधानी विशेष गाडी 19 जानेवारीपासून दररोज सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राजधानी एक्‍स्प्रेस दररोज दुपारी 4 वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सुटणार असल्याची माहिती मध्य रेल्वने दिली आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गाडी क्रमांक 01221 सीएसएमटीहून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी दुपारी 4.10 वाजता सुटते. ही एक्‍सप्रेस सायंकाळी 6.45 वाजता नाशिक रोडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.55 ला दिल्लीला पोहोचते. गाडी क्रमांक 01222 दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी दिल्लीहून दुपारी 4.55 ला रवाना होते. ही गाडी सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी सकाळी 11.50 ला पोहोचते.

CSMT to Delhi Rajdhani Express will run daily

-------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CSMT to Delhi Rajdhani Express will run daily