esakal | सीएसएमटी स्थानकाचा कायापालट होणार; जागतिक दर्जाचे मल्टिमॉडेल हबचा प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

सीएसएमटी स्थानकाचा कायापालट होणार; जागतिक दर्जाचे मल्टिमॉडेल हबचा प्रस्ताव
  • सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास
  • सार्वजनिक-खाजगी (पीपीपी)भागीदारीतून साकारणारा पहिला प्रकल्प
  • खाजगी कंपनीला 60 वर्षासाठी स्टेशन लिजवर मिळणार

सीएसएमटी स्थानकाचा कायापालट होणार; जागतिक दर्जाचे मल्टिमॉडेल हबचा प्रस्ताव

sakal_logo
By
प्रशांत कांबळे


मुंबई ः मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा विमानतळाच्या धर्तींवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसएमटीला जागतिक दर्जाचे मल्टिमॉडेल हब बनवण्याचा प्रस्ताव भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) तयार केला असून हे सीएसएमटी रेल्वे स्थानकांचे पुनर्विकासाचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. 

मोठी बातमी - काँग्रेसचा नेता म्हणतोय, "...तसं झाल्यास एका मिनिटात महाराष्ट्रातील सत्तेतून बाहेर पडू"

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली ही वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. गॉथिक शैलीतील ही इमारत जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. 2008 पासून सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. मात्र, जागतिक वारसा लाभलेल्या या स्थानक व परिसराचे काम करण्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्यामुळे त्याची मंजुरी आणि अन्य प्रक्रियांमध्ये बराच कालावधी गेला आहे. मात्र, आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. 

आयआरएसडीसीने  पीपीपी मॉडेलद्वारे या स्टेशनच्या  पुनर्विकासासाठी तत्वता मंजुरी दिली आहे. 20 ऑगस्टला या संदर्भात निवीदा प्रकाशित करण्यात आल्या असून. निवीदांची छाननी 22 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. स्टेशनच्या हेरीटेज दर्जाला हात न लावता हे स्टेशन पुर्नविकास करण्यात येणार आहे.   

मुंबईकर तुमचं टेन्शन संपलं, लवकरच जलसंकट दूर होणार

60 वर्षासाठी स्टेशन लिजवर
खाजगी विकासकाला हे स्टेशन 60 वर्षासाठी लिजवर मिळणार आहे.   या स्टेशनवर प्रवाशांसाठी सर्व सोयी, सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर  स्टेशनवर दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठीचे सेवाशुक्ल तिकीटमध्येच समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात तिकीटाचे दर वाढणार आहे. 

स्टेशनचा चेहरा मोहरा बदलणार 
सीएसएमटी येथे मेल-एक्स्प्रेस आणि लोकल यांच्यासाठी स्वतंत्र टर्मिनस आहे. तेथे प्रवाशांना वावरण्यासाठी मोकळी जागा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकाला लागूनच असलेल्या अ‍ॅनेक्स इमारतीसमोरील टॅक्सी स्टॅण्ड हटविण्यात येणार आहे. येणार्‍या प्रवाशांसाठी मोकळी जागा व बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. तसेच ऐतिहासिक सीएसएमटी इमारत पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलरी उभारण्यात येणार आहे. मशीद बंदर स्थानकाच्या दिशेला लोकल आणि लांब पल्ल्याच्या मार्गिकांच्या यार्डचे नूतनीकरण करण्यात येईल.

पनवेल बसपोर्टचा विकास वाऱ्यावर; अडीच वर्षात कंत्राटदाराने केले तुटपूंजे काम

प्रकल्पाचे वैशिष्टे
- सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून होणारा स्टेशनचा पुर्वविकास 
- विकासकाला 60 वर्षाच्या भाडेतत्वावर स्टेशन मिळणार 
- रेल्वे स्टेशन आणि स्टेशनलगतची जागा व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी विकसीत करण्याचे अधिकार
- 2.54 लाख चौरस मिटरची जागा व्यावसायिक वापरासाठी 
- विमानतळाच्या धर्तीवर स्टेशनवर पुर्ण सुविधा मिळणार 
- तिकिटामध्ये स्टेशनवरीव सेवा शुक्लाचा समावेश करणार  
- स्टेशनला मुंबईचे मध्यवर्ती रेल मॉलप्रमाणे विकसीत केले जाणार 
- पुर्नविकास करतांना पर्यावरण किंवा इतर गोष्टीची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही
- स्टेशनचा मास्टर प्लॅन मंजूर करण्याचे अधिकार भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाकडे असणार

loading image
go to top