CSMT चा कायापालट होणार! 10 कंपन्यांचा निवेदन प्रक्रियेत सहभाग

कुलदीप घायवट
Sunday, 17 January 2021

जागतिक वारसा असलेली आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीला नवीन झळाळी देण्यात येणार आहे.

मुंबई  :  जागतिक वारसा असलेली आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीला नवीन झळाळी देण्यात येणार आहे. यासाठी 10 मोठ्या नामांकित कंपनीने निवेदन प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. या 10 पैकी एका कंपनीची पुनर्विकासासाठी निवड केली जाणार आहे. ( The Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Heritage Building, a World Heritage Site and the headquarters of the Central Railway, will be given a new look)

विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानक करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांना विमानतळाप्रमाणे सोयी-सुविधा पुरविण्यासाठी स्थानकाच्या पुनर्विकासाची योजना आखली आहे. यानुसार सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या 
पुनर्विकासासाठी जीएमआर इंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड, कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लि., अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट लि, गोदरेज प्रॉपर्टी लि, ऑबेरॉय रिएलिटी लि यासह इतर  नामांकित मोठ्या कंपन्यांनी नोंदी केल्या आहेत. यातून एका कंपनीची लवकरच निवड केली जाणार आहे. 

Kevadiya Express | दादर वरून थेट ‘Statue of Unity’ला भेट देणे पर्यटकांसाठी आणखीन सोयीस्कर

ज्या विकासकाला हे कंत्राट देण्यात येईल, त्याकडे साठ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हे स्थानक दिले जाईल. विमानतळाच्या धर्तीवर या स्थानकात सर्व सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. या स्थानकाला मुंबईच्या मध्यवर्ती रेल्वे मॉल प्रमाणे विकसित केले जाणार आहे. 2.54 लाख चौरस मीटरचा जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळाची जागा निर्माण करण्यात येणार, लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट केंद्र स्थलांतरीत करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार आहे. त्याऐवजी समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलरी उभारली जाणार आहे. 
सीएसएमटी हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.पुर्नविकास करताना सीएसएमटी परिसरात रेल मॉलही उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाचीही साधने असतील. ज्या कंपनीबरोबर यासंदर्भातील करार केला जाईल, त्या कंपनीला या रेल्वे स्थानकावरील उद्योगांसंदर्भातील देखरेख आणि इतर (कर्मर्शियल) कारभार 60 वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिला जाईल. पुर्नविकास प्रकल्प खर्च 1 हजार 642 कोटी रुपये आहे.

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलेरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक 18 मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. सुविधांकरीता आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. स्थानकातील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल, प्रसाधनगृह व इतर सुविधा या खासगी विकासकाच्या अखत्यारितच राहणार आहेत.

CSMT will be transformed Involvement of 10 companies in the submission process to give new impetus

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CSMT will be transformed Involvement of 10 companies in the submission process to give new impetus