
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.17) रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी रविवारी (ता.17) रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविला. ( PM Narendra Modi on Sunday (Jan. 17) showed the green flag to eight railways express connected to the 'Statue of Unity' at Kevadia in Gujarat through video conferencing) पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातून थेट केवडिया एक्सप्रेस रविवारी (ता. 17) रोजीपासून सुरु झाली आहे. या एक्सप्रेस मुळे पर्यटकांना केवडीया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला भेट देणे आणखीन सोयीस्कर झाले आहे. यासह केवाडिया स्थानकाशी एक्सप्रेसद्वारे वाराणसी, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर या शहरांना जोडण्यात आले आहे.
गुजरात येथील केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. अवघ्या पाच वर्षात या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. नर्मदा नदी तील सरदार सरोवर धरणात हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळयाला देशविदेशातून दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. देशातील विविध शहरांतील पर्यटकांना ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ला भेट देण्यासाठी आठ एक्सप्रेस सुरू केल्या आहेत. केवडिया रेल्वेस्थानक अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असून, हे देशातील पहिले ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकीट प्राप्त रेल्वेस्थानक आहे.
मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा
रेल्वे योजनेच्या या उद्धाटनप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या योजनेमुळे भारतीय रेल्वेच्या नकाशावर जगातील सर्वात भव्य अशा स्टॅच्यू ऑफ यूनिटीला देखील स्थान मिळणार आहे. तसेच, यामुळे गुजरातमधील पर्यटनास देखील मोठी चालना मिळणार आहे. या आधी ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ला पाहण्यास जाण्यासाठी पर्यटकांना वडोदरा, भरूच आणि अंकलेश्वर रेल्वे स्थानक गाठून पुढील प्रवास करावा लागत होता. मात्र रेल्वे नेटवर्कच्या माध्यमातून देशातील विविध शहारांमधून गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ला पाहण्यासाठी पर्यटकांना सहजरित्या पोहचता येणार आहे.
Kevadiya express It is even more convenient for tourists to visit the Statue of Unity directly from Dadar
------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )