Mumbai News : असंख्य फसवणूक झालेले गुंतवणूकदार सध्या चिंतेत आहेत. ठाण्यात सायबर गुन्हेगारी वाढली असतानाच फसवणुकीचे जाळेही विस्तारले आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरामध्ये असे एक हजार ७१० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
ठाणे : आयुष्यभर चालक म्हणून काम केले; मात्र ‘भरभराटीच्या’ प्रलोभनाने चेंबूरमधील ६५ वर्षीय जनार्दन यांना जमापुंजी गमवावी लागली. टोरेसमध्ये मुलाने आधी २० हजार गुंतवले. त्याला परताव्याचा पहिला हप्ता आला. त्याच्या सल्ल्यानुसार पाच लाखांची गुंतवणूक केली.