esakal | 'अॅमेझॅान लकी ड्रॉ 'च्या नावाखाली बॅंक व्यवस्थापकाच्या मुलीला हजारो रुपयांचा गंडा!
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

'अॅमेझॅान लकी ड्रॉ 'च्या नावाखाली बॅंक व्यवस्थापकाच्या मुलीला हजारो रुपयांचा गंडा!

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : अॅमेझॉनमध्ये लकी ड्रॉमध्ये (Amazon Lucky Draw) नाव आल्याचे सांगून खासगी बँकेच्या (Private Bank) मुख्य व्यवस्थापकाच्या ( Manager) मुलीलाच सायबर चोरट्यांनी (Cyber Criminals) गंडा घातला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने माहिम पोलिसांकडे ( Mahim Police) तक्रार केली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तक्रारदार 27 वर्षीय तरुणी ही माटुंगा (Matunga) येथील रहिवासी आहे. ( Cyber Criminal fraud to bank manager daughter via lucky draw amazon)

सायबर भामट्यांनी दूरध्वनी करून तरुणीला त्यांचा ऑर्डर कोड क्रमांक सांगितला. त्यानंतर तुम्हाला या क्रमांकावर लकी ड्रॉ लागला असून पाच पैकी एक गिफ्ट तुम्हाला निवडायला लागेल. त्यानुसार तक्रारदार तरुणीने फ्रीज निवडला. सुरूवातीला आरोपींनी फ्रीज मिळवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करण्यास सांगितली. ती केल्यानंतर त्यांना एका वरिष्ठ अधिका-याच्या नावाने दूरध्वनी आला. त्याने तुमच्या पेटीएमवर ऑर्डरचा ट्रान्झॅक्शन आयडी बनवावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी 11 हजार 990 रुपयांचे ट्रान्झॅक्शन आयडी बनावले. काही वेळानंतर त्यांचा पुन्हा दूरध्वनी आला त्यात हे आयडी चुकले असून आणखी 10 रुपये वाढवून 12000 हजार रुपयांचा ट्रान्झॅक्शन आयडी बनावावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: शाळेच्या शुल्क अधिनियमाच्या सुधारणेबाबत काय म्हणतात शिक्षणतज्ज्ञ ?

आरोपीनी हळूहळू ही रक्कम वाढवली. पण तक्रारदार तरुणीच्या खात्यातून रक्कम जात होती. त्यावर आरोपींनी ही रक्कम रिफंड करण्यात येईल, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन तिने 98 हजार 572 रुपये रकमेचे व्यवहार केले. त्यानंतर त्यांनी दुस-या बँक खात्यातून रिक्वेस्ट पाठवण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार तरुणीला आरोपींवर संशय आला. तिने याप्रकरणी माहिम पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

loading image