

Fraud Case
ESakal
ठाणे : सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ठाण्यातील एका ६२ वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला तब्बल ४९ लाख सात हजार रुपयांचा गंडा घातला आहे. पाच दिवस स्वतःच्याच घरात ओलीस राहिलेल्या या पित्याची फसवणूक होत असल्याचे अमेरिकेत असलेल्या मुलीने लक्षात आणून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.