सायबर क्राईमः KYCच्या नावाखाली जीएसटी अधिकाऱ्याला तब्बल २ लाखांचा गंडा

सायबर क्राईमः KYCच्या नावाखाली जीएसटी अधिकाऱ्याला तब्बल २ लाखांचा गंडा

मुंबईः सध्या मुंबईत सायबर क्राईमनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस सायबर क्राईममध्येही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे तुम्हीही सतर्क नसाल तर तुमचीही फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबई शहर कोरोना व्हायरस सारख्या संकटाचा सामना करत आहे. त्यातच कडक कायदे आणि काटेकोरपणे लक्ष देणारे सायबर पोलिस असूनही सायबर क्राईमचे गुन्हे काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. तब्बल २ लाखांचा गंडा लागल्याची माहिती समोर आली आहे. 

फसवणूक करणाऱ्यांनी पीडित अधिकाऱ्याला KYC भरण्यासाठी एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितलं. या अॅप्लिकेशनचा रिमोट अॅक्सेस हा फसवणूक करण्याच्या फोनमध्ये होता. जसं पीडित अधिकाऱ्यानं अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं त्यांना अधिकाऱ्याच्या मोबाईल फोनचा अॅक्सेस मिळाला. 

समोर आलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी पीडितेच्या क्रेडिट कार्डच्या तपशीलाचा वापर केला. त्यानंतर जीएसटी अधिकाऱ्याच्या मोबाईल फोनवरुन सहा बनावट व्यवहार देखील केले. 

पीडित व्यक्ती हा सीजीएसटीमध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत आहे आणि तो मुंबई सेंट्रल येथे राहतो. ही फसवणूक ९ ऑगस्टला घडली. जेव्हा पीडित व्यक्तीला स्वतःच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून त्याचं केवायसी प्रलंबित असल्याचं मॅसेज आला. त्या मॅसेजमध्ये लिहिलं होतं की, तुम्ही तुमच्या बँक खात्याची औपचारिकता पूर्ण केली नाही आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते बंद होईल. पीडित अधिकाऱ्यानं पुन्हा त्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही. 

त्यानंतर संध्याकाळी, एका व्यक्तीनं अधिकाऱ्याला फोन केला आणि म्हणाला की, केवायसीच्या औपचारिकतेसाठी आवश्यक असणारं पॅन कार्ड आणि क्रेडिट कार्डचा तपशील तयार ठेवा. त्यानंतर आरोपीनं अधिकाऱ्याला गुगल प्ले स्टोअर वरून 'क्विक सपोर्ट' नावाचं अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं.

या अॅप्लिकेशनद्वारे जेव्हा तुम्ही युनिक आयडी कोणासोबत तरी शेअर करता, त्यानंतर  तुमच्या मोबाईल फोनचा अॅक्सेस दुसऱ्या व्यक्तीला मिळतो. अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर आरोपीनं अधिकाऱ्याला आपलं नाव, पॅन कार्डचा तपशील त्यात भरण्यास सांगितलं. यानंतर, आरोपीनं त्या अधिकाऱ्याला वेबसाइटची लिंक दिली आणि त्यात कार्डचा तपशील भरण्यास सांगितलं.  

आरोपी जसं जसं सांगत होता तसं या पीडित अधिकाऱ्यानं त्याच्या सूचनांचं पालन केलं. पीडित अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डवरून १ लाख ८० रुपयांचे आरोपीनं सहा व्यवहार केलं. याशिवाय, त्याच्या खात्यातून दहा हजार रुपये काढण्यात आलं. या प्रकरणी पीडित अधिकाऱ्यानं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Cyber fraud GST officer duped Rs 2 lakh downloading app for KYC

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com