मुंबई : गणेशोत्सवात घरपोच प्रसाद, ऑनलाइन दर्शन, व्हीआयपी पासपासून लॉटरी, फेस्टिव्हल ऑफर, कर्ज अशा विविध निमित्ते आणि प्रलोभनांद्वारे भक्तांना लुबाडण्यासाठी सायबर भामट्यांनी जाळे विणले आहे. सतर्क राहण्यासोबत अति आकर्षक सेवा, अनाकलनीय सूट देणाऱ्या ॲप, संकेतस्थळे, जाहिरातींकडे थेट दुर्लक्ष करण्याचा सल्ला पोलीस आणि सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना देऊ केला आहे.