पहाटेच्यावेळी तंदुरुस्तीसाठी सायकलिंग, बोईसर परिसरात सायकलस्वारांची गर्दी

cycling
cycling

मनोर : कोरोना संसर्ग काळात ग्रामीण तसेच शहरी भागातील रहिवाशांच्या जीवनपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. कोरोनामुळे व्यायामशाळेत जाण्यास नागरिक अद्याप तयार नसल्याने नागरिकांची आता व्यायामासाठी सायकल वापरण्यास पसंती मिळत आहे. पहाटेच्या वेळी अनेक तरुण बोईसर शहर, ग्रामीण भागात सायकलवरून रपेट मारत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सायकल खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. 

गेल्या काही काळापासून सहज कर्ज उपलब्ध होत असल्याने दुचाकींची खरेदी वाढून सायकल अडगळीत गेल्या आणि दुचाकींच्या संख्येत वाढ झाली. प्रत्येक कामासाठी दुचाकीचा वापर वाढला आहे; परंतु गेल्या काही महिन्यात हे चित्र बदलले असून कोरोनाकाळात प्रत्येक जण आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देऊ लागले आहेत. सायकलिंग चांगला व्यायाम असल्याने आता अनेक जण सायकल घेऊन तीन-चार किलोमीटर अंतराची रपेट मारताना दिसून येत आहेत. 

बोईसर शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर पहाटेच्या वेळी अनेक सायकलस्वार दिसतात. यात लहान मुले, तरुण, वृद्ध यांचा समावेश असतो. तारापूर औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांवर पहाटे शंभर ते दीडशे सायकलस्वार रपेट मारत असल्याचे चित्र दिसून येते. नियमित सायकलिंग करणारे उद्योजक रूपेश अधिकारी कोरोनाकाळाच्या आधीपासूनच सायकलिंग करतात; परंतु कोरोनाकाळात शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देत सायकस्वारांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. सायकलमुळे प्रदूषण होत नसून पैशांचीही बचत होते आणि शारीरिक व्यायामही होतो. एकूणच सायकलिंग फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. अडगळीत पडलेल्या सायकली दुरुस्त करण्यात येत आहेत. तसेच नवीन सायकलीही विकत घेतल्या जात आहेत. टाळेबंदीच्या काळात सायकलच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती सायकलविक्रेत्यांनी दिली. 

सायकलची मागणी वाढली 
कोरोनाकाळात सायकलिंग करणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याने विविध ब्रॅण्डच्या सायकल खरेदीकडे कल वाढला आहे. तीन हजारापासून दहा हजारापर्यंत सायकलच्या किमती आहेत; तर काही उत्पादन कंपनीच्या सायकलच्या किमती लाखाचा घरात आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Cycling for fitness a crowd of cyclists in the Boisar area

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com