मीरा भाईंदरचा पाणी प्रश्‍न सुटणार! 'सूर्या योजने'ला गती देण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मीरा भाईंदरचा पाणी प्रश्‍न सुटणार! 'सूर्या योजने'ला गती देण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

भाईंदर ः मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरातून पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत असून ऐन उन्हाळ्यात शहराचा पाणी प्रश्‍न बिकट होतो. हा प्रश्‍न सोडला नाही तर हा प्रश्‍न आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे शहरासाठी "एमएमआरडीए'च्या माध्यमातून सुरु असलेल्या 218 एमएलडी सूर्या पाणी पुरवठा योजनेला गती द्यावी. पुढील एक - दीड वर्षात ही योजना पुर्ण करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला केल्या आहेत. 

सूर्या योजना मार्गी लागावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यां उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रश्‍न तत्वरीत सोडवण्याची विनंती केली होती. ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे. 
नुकतीच ठाणे- पालघर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सहयाद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या आमदारांची एक बैठक झाली. याप्रसंगी मीरा भाईंदर शहरातील महत्वाचे मुद्दे आमदार सरनाईक यांनी या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. ठाणे जिल्हा पालकमंत्री व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विकास कामांशी संबंधित प्रशासकीय अधिकारी , आमदार बालाजी किणीकर , आमदार शांताराम मोरे, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार गीता जैन, आमदार विश्वनाथ भोईर आदी यावेळी उपस्थित होते. 

- मेट्रो मार्गाला मिळणार गती 
यावेळी मुंबई मेट्रो मार्ग-4 (वडाळा - कासारवडावली - गायमुख ) या मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. मेट्रो मार्ग 4 व मेट्रो मार्ग 10 हे एकमेकांना जोडून वर्तुळाकार मेट्रो मार्ग होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी गायमुख ते मीरारोड हा मेट्रो मार्ग मंजूर झाला आहे. गायमुख ते काशीमीरा-मीरारोड या अंदाजे 5 किमी मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया व्हावी, अशीही मागणी सरनाईक यांची केली. त्यावर गायमुख ते मीरारोड-काशिमीरा या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान शहरातील विविध प्रश्‍नांकडे आमदार सरनाईक यांच्यासोबत आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव , नगरविकास सचिव , 'एमएमआरडीए'चे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mira Bhayanders water problem will be solved Chief Ministers suggestion to speed up Surya Yojana

------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com