नवी मुंबईला चक्रीवादळाचा तडाखा ! अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 3 June 2020

बेलापूर मधील डोंगर पायथ्याशी वसलेल्या दुर्गामाता संभाजीनगर मधील झोपडीपट्टीतील 66 नागरिकांना आणि नेरूळ मधील रमेश मेटल दगड-खाणी जवळ राहणाऱ्या 125 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

नवी मुंबई : कोकण किनारपट्टीला धडकलेल्या निसर्ग वादळाचा तडाखा नवी मुंबई शहराला बसला आहे. बेलापूर मधील डोंगर पायथ्याशी वसलेल्या दुर्गामाता संभाजीनगर मधील झोपडीपट्टीतील 66 नागरिकांना आणि नेरूळ मधील रमेश मेटल दगड-खाणी जवळ राहणाऱ्या 125 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. सीबीडी आणि नेरुळ मधील महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. तसेच इतर परिसरातील डोंगराच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ हलवण्याचे आदेश महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

प्रतिकुल परिस्थितही रेल्वे श्रमिकांच्या सेवेसाठी सज्ज! वाचा सविस्तर बातमी

वादळामुळे नवी मुंबई शहरात तशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे 8 नोड मध्ये 33 झाडे उन्मळून पडली. या झाडांमुळे काही वाहने आणि सुरक्षा भिंतींचे नुकसान झाले. रस्त्यावर कोसळली झाडे बाजूला करण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने सतर्क रहात पूर्वतयारी केली आहे. वादळाच्या वातावरणातही नवी मुंबई महापालिकेचे सर्व विभाग व आपत्कालीन व्यवस्थापन समुह परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीपासून सज्ज आहेत. अण्णासाहेब मिसाळ सर्व विभागांतील स्थितीवर नियंत्रक लक्ष ठेवून असून त्यांचा सर्वांशी उपाययोजनांबाबत सतत संवाद सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclone hits 33 trees in Navi Mumbai; Moved 191 civilians to the foothills