Cyclone Tauktae: मुंबईतील विमानसेवा ८ वाजेपर्यंत बंदच

लोकल सेवा धीम्या गतीने सुरू; सी-लिंक बंद
Trains-Flight-Services-Affected
Trains-Flight-Services-AffectedTrains Photo by Nilesh More
Summary

लोकल सेवा धीम्या गतीने सुरू; सी-लिंक बंद

Cyclone Tauktae Updates मुंबई: तौक्ते वादळी वाऱ्याचा मुंबईला मोठा फटका बसला. अतिवेगाने वाहणाऱ्या पावसात झाडांची मोठी पडझड झाली. घाटकोपरमध्ये रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर आज सकाळी ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास झाडाची फांदी कोसळली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद होती. तसेच वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळावरील काही फ्लाईट्सदेखील परत पाठवाव्या लागल्या. तर काही विमानांना लँडिंगसाठी सुरतचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, सुरूवातीला २ वाजेपर्यंत बंद असलेल्या विमानसेवा नंतर ४ वाजेपर्यंत बंदच ठेवण्यात येणार होत्या. पण वादळाची स्थिती बिकट असल्याने सर्व उड्डाणे आणि लँडिंग रात्री ८ वाजेपर्यंत बंद असणार आहेत. (Cyclone Tauktae affects Mumbai Local Trains and Airport Services)

Trains-Flight-Services-Affected
मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

सकाळच्या खोळंब्यानंतर रेल्वे धीम्या गतीने सुरू

सकाळपासून धुवांधार पडणाऱ्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या एक नंबर ट्रॅकवरील घाटकोपर-विक्रोळी दरम्यान एक झाड ओव्हरहेड वायरवर कोसळले. ठाण्याकडे जाणाऱ्या धीम्या लोकलच्या डब्यावर हे झाड कोसळले. त्यामुळे काही काळासाठी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद होती. मध्य रेल्वेच्या घाटकोपर विक्रोळी दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक ही जलद मार्गावर वळवण्यात आली होती. पण नंतर हे पडलेलं झाड तिथून हटवण्यात आलं आणि ११ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा मार्ग पूर्ववत सुरू झाला. मात्र लोकलच्या सर्व मार्गांवर सध्या वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Photo by Nilesh More
Trains-Flight-Services-Affected
विरारमधल्या गायब झालेल्या आजोबांचं अखेर गूढ उकललं...

तौक्ते वादळामुळे केवळ मुंबई लोकल सेवाच नव्हे तर विमानसेवादेखील बाधित झाली. वादळाचा आणि वाऱ्याचा वाढता जोर पाहता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सर्व उड्डाणे (Take Off) आणि लँडिंग (Landing) दुपारी २ पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. या कालावधीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या तीन विमानांची सेवा बाधित झाली असून स्पाईसजेटच्या एका विमानाचं लँडिंग सुरतकडे डायव्हर्ट करण्यात आलं. इंडिगोचं एक विमान लखनऊला परत पाठवण्यात आलं. तर दुसरं इंडिगोचं विमान हैदराबादकडे डायव्हर्ट करण्यात आलं.

Trains-Flight-Services-Affected
Cyclone Tauktae: डोक्यात विजेचा खांब पडून तरुणाचा मृत्यू

वांद्रे-वरळी सीलिंक बंद; मुंबई महानगरपालिकेची सूचना

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पाऊले उचलली आहे. यामध्ये समुद्रामधून मार्ग काढणारा वांद्रे-वरळी सी-लिंकसुद्धा बंद करण्याच्या सूचना मुंबई वाहतूक पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने हवामानाच्या अंदाजावरून रस्ते वाहतुकीचा सुद्धा आढावा घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेकडून पुढची सूचना मिळेपर्यंत सी-लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई वाहतूक विभागाचे कंट्रोल रूम ऑफिसर (CRO) तानाजी सांगळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com