esakal | धारावीचं कौतुक आहेच, परंतु दादरमधील अनियंत्रित रुग्णवाढ जास्त चिंताजनक

बोलून बातमी शोधा

धारावीचं कौतुक आहेच, परंतु दादरमधील अनियंत्रित रुग्णवाढ जास्त चिंताजनक}

लॉकडाऊन कालावधीत दादरमधील कोरोना रुग्णांची संख्या खूपच आवाक्यात होती, पण अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यापासून त्यात वाढ होत आहे. एवढेच नव्हे तर बुधवारी दादरमध्ये धारावीपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले. 

धारावीचं कौतुक आहेच, परंतु दादरमधील अनियंत्रित रुग्णवाढ जास्त चिंताजनक
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई ः लॉकडाऊन कालावधीत दादरमधील कोरोना रुग्णांची संख्या खूपच आवाक्यात होती, पण अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यापासून त्यात वाढ होत आहे. एवढेच नव्हे तर बुधवारी दादरमध्ये धारावीपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले. 

कल्याण-डोंबिवली, ठाण्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर?, रुग्णांचा आकडा धक्कादायक
 

दादरमध्ये आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे बुधवारी 59 बाधित आढळले. येथील रुग्णवाढीचा दर आता दोन टक्के आहे, तर धारावीचा केवळ 0.41 टक्के आहे. याच वृत्तानुसार दादरमधील रुग्णवाढीचा दर सध्या मुंबईच्या सरासरी वाढीपेक्षा जास्त आहे. मुंबईतील वाढीचा दर सध्या 1.36 टक्के आहे. दादरमधील रुग्ण दुपटीचा दर 31 दिवस असेल असा अंदाज आहे. तर हेच धारावीबाबत 247 दिवसांपर्यत मानले जात आहे. 

पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेबाबत घडला 'हा' प्रकार.. वाचा बातमी सविस्तर

दादर हे जी उत्तरमध्ये येते. त्याचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी चाचणींचे प्रमाण वाढल्याने रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर आता प्रत्येक इमारती तसेच चाळीबाहेर तपासणी सुरु केली आहे. जी उत्तर मध्ये एकंदर 1 हजार 277 रुग्ण आढळले आहेत. याच जी उत्तरमध्ये माहीम तसेच धारावीचाही समावेश आहे. 

धक्कादायक! बालभारतीच्या पुस्तकातून सुखदेव यांचे नाव वगळले; देशभक्तांकडून संताप व्यक्त

धारावीत मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत होते, त्यावेळी दादरमध्ये खूपच कमी जणांना बाधा झाली होती. लॉकडाऊन कालावधीत येथील लोकांनी नियमांचे कडेकोट पालन केले होते. मात्र आता मार्केट, दुकाने, कार्यालये खुली झाली आहे. त्यामुळे लोकांचे बाहेर पडण्याचे प्रमाणही वाढले आहे, याकडेही आधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )