esakal | दादर: हिंदमाता पुलाखाली रुग्णांना बंदी, मुंबई पालिका उभारणार कुंपण
sakal

बोलून बातमी शोधा

दादर: हिंदमाता पुलाखाली रुग्णांना बंदी, मुंबई पालिका उभारणार कुंपण

हिंदमाता पुलाखाली आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना राहाता येणार नाही. या पुलाखाली महानगर पालिका कुंपण घालणार असून प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

दादर: हिंदमाता पुलाखाली रुग्णांना बंदी, मुंबई पालिका उभारणार कुंपण

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबईः  हिंदमाता पुलाखाली आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना राहाता येणार नाही. या पुलाखाली महानगर पालिका कुंपण घालणार असून प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

परळ येथील टाटा स्मारक रुग्णालय, केईएम तसेच वाडिया रुग्णालयात देशभरात रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना मुंबईत राहाण्याची सोय नसल्याने या परिसरातील पदपथ तसेच हिंदमाता पुलाखाली ते मुक्काम करतात. मात्र, त्यामुळे या परिसरात अस्वच्छता होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते. महापालिकेने यापूर्वी काही वेळा या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसह धर्मशाळांमध्ये राहाण्याची सोय केली आहे. मात्र तरीही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पुलाखाली तसेच परिसरातील पदपथावर राहातात.

हा परीसर रुग्णालयापासून जवळ असल्याने रोजच्या प्रवासाची दगदग रुग्णांना करावी लागत नाही. तसेच प्रवासासाठी खर्चही होत नाही, असे असले तरी यामुळे अस्वच्छता होत असलेल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहे. अनेक वेळा वादाचेही प्रसंग निर्माण झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने आता या पुलाखालील परिसराला कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा-  दुसऱ्या अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर संजय राऊत ICU मध्ये

दादर येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाण पुलाखाली महापालिका उद्यान तयार करत आहे. उड्डाण पुलाच्या खालील काही भागात कुंपण घालण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता हिंदमाता उड्डाण पुलाखालीही कुंपण घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या सर्व कामांसाठी महानगर पालिका 5 कोटी 66 लाख 28 हजार रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव या महिन्याच्या महासभेच्या कामकाजात समाविष्ट करण्यात आले आहे. 

अधिक वाचा-  वर्वरा राव यांना नानावटी रुग्णालयात ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Dadar Patients banned under Hindmata bridge Mumbai bmc build garden

loading image
go to top