esakal | दादरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी फाडले दुकानांवरील सरकारच्या निषेधाचे स्टिकर्स
sakal

बोलून बातमी शोधा

dadar-shop.jpg

'तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करताय'

 

दादरमध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी फाडले दुकानांवरील सरकारच्या निषेधाचे स्टिकर्स

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्याच्या वेगवेगळया भागात दुकाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून या निर्णयाचा निषेध केला आहे. निर्बंधांच्या नियमावलीवरुन व्यापारी वर्गामध्ये संभ्रम आहे. कारण निर्बंधांची माहिती देताना दुकाने बंद राहतील, असे स्पष्टपणे म्हटले नव्हते. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दुकाने बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा दादरमध्ये व्यापाऱ्यांनी जोरदार निषेध केला. 

दादरमध्ये व्यापाऱ्यांनी दुकानांवर सरकारी निर्णयांचा निषेध करणारे स्टिकर्सही चिकटवले होते. मात्र काही वेळातच पोलिसांनी, मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या दुकानांवर लावलेले स्टिकर्स काढले. यावेळी दुकानदारांनी त्यांना विरोध केला. खासगी मालमत्तेवर लावलेले स्टिकर्स तुम्ही काढू शकत नाहीत, असे व्यापाऱ्यांनी सांगितल्यानतंर तुम्ही वॉर्ड ऑफीसरला जाऊन विचारा असे उत्तर महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करताय, असेही एका व्यापाऱ्याने सुनावले.  

दुकाने बंद केल्याने व्यापारी चिडले, दादरमध्ये कडक शब्दात निषेध

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. राज्यातील अनेक भागात बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केले आहेत. मॉल्स, हॉटेल्स, प्रार्थनास्थळे ३० एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. प्रवासावरही पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून या निर्बंधांची कठोर अमलबजावणी सुरु झाली आहे. 
 

loading image