esakal | दुकाने बंद केल्याने व्यापारी चिडले, दादरमध्ये कडक शब्दात निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

shops.jpg

दुकाने बंद केली, तर आम्ही खाणार काय?

दुकाने बंद केल्याने व्यापारी चिडले, दादरमध्ये कडक शब्दात निषेध

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. राज्यातील अनेक भागात बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केले आहेत. मॉल्स, हॉटेल्स, प्रार्थनास्थळे ३० एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. प्रवासावरही पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून या निर्बंधांची कठोर अमलबजावणी सुरु झाली आहे. 

व्यापारी वर्गामध्ये सरकारच्या या निर्बंधांबाबत नाराजीची भावना आहे. आज सकाळी पोलिसांनी रस्त्यावर उतरुन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करायला लावली. त्यामुळे मुंबईत व्यापारी वर्गामध्ये नाराजी, संताप आहे. कारण निर्बंधांच्या नियमावलीवरुन व्यापारी वर्गामध्ये संभ्रम आहे. कारण निर्बंधांची माहिती देताना दुकाने बंद राहतील, असे स्पष्टपणे म्हटले नव्हते. 

जानेवारीच्या अखेरपासून पावलं का नाही उचलली? राज ठाकरेंचा सवाल

आज पोलिसांनी व्यापारी वर्गाला दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यावेळी दादरमध्ये व्यापारी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सरकारच्या या निर्बंधांचा कडक शब्दात निषेध केला. आपल्या दुकानांवर निषेधाचे कागद चिकटवले. दुकाने बंद केली, तर आम्ही खाणार काय? नोकरांना पगार कसा देणार? अशी त्यांचे प्रश्न होते. मागच्यावर्षी सुद्धा लॉकडाउनमुळे सहा ते सात महिने दुकाने बंद होती. आता सुद्धा पुन्हा दुकाने बंद केल्याने सर्वसामान्य व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. 

loading image