esakal | डहाणू येथे मालगाडीचा एक डबा रूळांवरून घसरला
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणू येथे मालगाडीचा एक डबा रूळांवरून घसरला

डहाणू येथे मालगाडीचा एक डबा रूळांवरून घसरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील डहाणू येथे मालगाडीचा एक डबा रेल्वे रूळांवरून खाली घसरण्याची घटना घडली. ही घटना सोमवारी, (ता.11) रोजी सकाळी 9.50 वाजता पश्चिम रेल्वेच्या डहाणू यार्ड येथे घडली. यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. तर, डबे रिकामे असल्याने जास्त नुकसान झाले नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा: Corona Update : राज्यात दुसऱ्या लाटेनंतरची रूग्णांची निच्चांकी नोंद

डहाणू येथील थर्मल प्लांटमधून सकाळीच्या सुमारास मालगाडी येत होती. डहाणू यार्ड येथे मालगाडीचा एक डबा रेल्वे रूळांवरून खाली घसरला. मात्र, हा मालडबा रिकामा असल्याने कोणतेही जादा नुकसान झाले नाही. तसेच या घटनेमुळे लोकल सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच, सकाळी 9.55 वाजता अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी घसरलेल्या डब्याची पाहणी केली. त्यानंतर डबा रेल्वे रूळांवरून बाजूला काढण्याचे आणि रूळ दुरूस्तीचे काम हाती घेतले. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी, मालगाडीचा डबा रेल्वे रूळांवरून खाली का घसरलेल्याची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

loading image
go to top