Palghar News: निकणे गावचा ५० वर्ष जुना पूल धोकादायक, ग्रामस्थांचा प्रवास ठरतोय जीवघेणा; प्रशासनाचे दुर्लक्ष
Dahanu Old Bridge: डहाणू निकणे गावातील ५० वर्ष जुना पूल धोकादायक अवस्थेत आहे. परिणामी नागरिकांना जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास करावा लागत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची माहिती मिळत आहे.
कासा : डहाणू तालुक्यातील निकणे गाव आणि परिसरातील १२ पाड्यांसाठी जीवनरेषा ठरलेला अंदाजे १९७५ मध्ये बांधलेला पूल आजही धोकादायक अवस्थेत आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे हजारो ग्रामस्थ संकटात आहेत.