esakal | मुंबईत कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला! सोमवारी 27,827 चाचण्या
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus test

मुंबईत कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला! सोमवारी 27,827 चाचण्या

sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patient) संख्या कमी झाल्याने मुंबईतील दैनंदिन कोविड चाचण्यांची  संख्या (Corona Test) निम्म्याने कमी झाली आहे. सोमवारी मुंबईत (Mumbai) 27,827 लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून दैनंदिन चाचण्यांमध्ये घट (corona Test Decreasing) दिसत असून साधारणता 30 हजार चाचण्या कमी होत आहेत. यापूर्वी दैनंदिन 60 हजाराहून अधिक चाचण्या होत होत्या. त्यात आता निम्म्याने घट झाली आहे. सोमवारी 27,827, रविवारी 34,980, शनिवारी 37,036 तर शुक्रवारी 39,075 चाचण्या केल्या गेल्या. एप्रिल महिन्याच्या (April Month) सुरुवातीला दैनंदिन चाचण्यांची ( Daily Corona Test) संख्या ही 40 ते 45 हजारादारम्यान होती. तर मे आणि जून महिन्यात दैनंदिन  चाचण्यांची  संख्या ही 60 हजाराच्या वर होती. (Daily Corona tests decreasing compare to previous months corona testing)

हेही वाचा: "झोटिंग समितीचा अहवाल लपवण्यात आलाय"; काँग्रेसचा आरोप

मुंबईत बाधित होण्याचे प्रमाण काहीसे घटले आहे. असे असले तरी आवश्यकतेनुसार चाचण्या केल्या जात आहेत. सध्या मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी झाला असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. गरजेनुसार  चाचण्या गेल्या जात असून केंद्र किंवा पथकांची संख्या कमी केलेली नाही. रुग्णांची संख्या कमी झाल्याने चाचण्यांची संख्या देखील कमी झाल्याचे ही डॉ. गोमारे म्हणाल्या. दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर कमी होऊन 1.7 पर्यंत खाली आला आहे. आतापर्यंत 75,62,401 चाचण्या करण्यात आल्या असून सक्रिय रुग्णांची संख्या 7,120 इतकी आहे. 

loading image