esakal | मुंबईत कोरोना रुग्णांचा दैनंदिन आलेख चढताच
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोना रुग्णांचा दैनंदिन आलेख चढताच

मुंबईत कोरोना रुग्णांचा दैनंदिन आलेख चढताच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी गेल्या आठवडाभरात चार वेळा मुंबईत ५०० हून अधिक रुग्ण आढळले. शिवाय पॉझिटिव्हीटी दरही वाढत आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे.

मुंबईत १५ ऑगस्टनंतर शिथिल झालेल्या निर्बंधांमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होत आहे. २१ ऑगस्ट रोजी रुग्णदुपटीचा कालावधी २०३० दिवसांवर होता. ११ ऑक्टोबर रोजी तो १,०५८ पर्यंत घसरला. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महिनाभर ०.०६ टक्क्यांवर राहिलेला कोविडवाढीचा दर ०.०७ टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा: मराठी भाषा भवनासाठी चार वास्तुविशारदांचे प्रस्ताव; मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण

निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाल्यानंतर नागरिक नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

आठवडाभरातील रुग्णसंख्या

तारीख रुग्ण

३ ऑक्टोबर ५७३

४ ऑक्टोबर ३३९

५ ऑक्टोबर ४२७

६ ऑक्टोबर ६२४

७ ऑक्टोबर ४५३

८ ऑक्टोबर ५२९

९ ऑक्टोबर ५१०

loading image
go to top