

Damodar Hall Redevelopment
ESakal
मुंबई : लालबाग, परळ आणि दादर भागातील मराठी नाट्य संस्कृतीचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या 'दामोदर हॉल'चा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली नाट्यगृह पाडण्यात आले, मात्र नव्या वास्तूचे काम अद्याप सुरू न झाल्याने "दामोदर हॉलचा पुनर्विकास केव्हा होणार" असा संतप्त सवाल आता नाट्यप्रेमींकडून विचारला जात आहे.