Building Collapse : डोंबिवलीत अतिधोकादायक इमारत कोसळली

पश्चिमेतील कोपर भागातील लक्ष्मण पावशे हि धोकादायक इमारत मंगळवारी संध्याकाळी अचानक कोसळली.
Building Collapse
Building Collapsesakal

डोंबिवली - पश्चिमेतील कोपर भागातील लक्ष्मण पावशे हि धोकादायक इमारत मंगळवारी संध्याकाळी अचानक कोसळली. तळमजला अधिक दोन मजली असलेल्या या इमारतीत सहा कुटुंब राहत होती. इमारत कोसळत असल्याची कुणकुण लागताच रहिवाशांनी बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवित हानी यात झाली नाही.

काही दिवसांपूर्वीच पूर्वेतील एक धोकादायक इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

चाळीस वर्षापूर्वीची ही इमारत असून यात 9 सदनिका होत्या. इमारत धोकादायक झाल्याने बहुतांश रहिवासी घर खाली करून गेले होते. मात्र 6 कुटुंब याठिकाणी रहात होती. मंगळवारी सायंकाळी इमारतीचे काँक्रीट हळूहळू पडत असल्याचे दिसताच रहिवासी तात्काळ ओरडा करत घराबाहेर पडले. त्यानंतर काही क्षणात इमारत कोसळली. हा रस्ता वर्दळीचा रस्ता आहे मात्र सुदैवाने त्या वेळेस तेथून कोणी जात नव्हते.

इमारत कोसळल्या मुळे काँक्रीटचा धुरळा काही वेळ परिसरात पसरला होता. इमारत कोसळताच या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या पादचारी, वाहन चालकांची पळापळ झाली.

धोकादायक इमारत कोसळल्याची माहिती मिळताच ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेचा उपाय म्हणून काही वेळ या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, वाहतूक पोलीस, पोलीस दाखल झाले.

रात्रीत या इमारतीचा ढिगारा बाजुला करण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी आयरे गावात धोकादायक इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com