Dasara Ganpati: कोकणात दसऱ्याच्या मुहूर्तावर गणरायाचे आगमन, हे आहे खास कारण !

Ganesh
Ganeshesakal

उरण, ता.२४ (बातमीदार)ः दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर उरण परिसरातील ग्रामीण भागांत गणेशाचा प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे मंडपात आगमन झाल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर मिरवणुकांचा जल्लोष उरण परिसरात पहायला मिळत आहे.
गेल्या दशकभरात दसऱ्याच्या गणरायाच्या उत्सवाचे प्रमाण उरण तालुक्यातील आगरी समाजात वाढले आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर, भोम, मोठी जुई तसेच पाले या ठिकाणी ५० पेक्षा जास्त गणरायाचे आगमन झाले असून ३५ पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळाचे आहेत. पण, बहुतांश जणांमध्ये दसऱ्याला श्रीगणेशाचे आगमन होत असल्याबद्दलची माहिती नसल्याने याबाबतची उत्सुकता आहे. तसेच नवरात्रीनंतर आता गणरायाचे आगमन झाल्याने उरण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

सोयर-सुतक असल्याने प्रथा
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त आहे. त्यामुळे ज्यांना गणेशचतुर्थी अथवा साखर चौथीला सोयर-सुतक लागलेले असते, ते या दिवशी गणपती बसवतात. गणेश चतुर्थीच्या काळात अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पितृपक्ष सुरू होतो. तसेच पितृपक्षानंतर नवरात्र सुरू होत असल्याने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गणरायाची प्राणप्रतिष्ठपना करतात.

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे विघ्नांचा नाश करणारा आराध्य दैवत गणपती असल्यामुळे उरण परिसरात या काळात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. यात काही सार्वजनिक मंडळाचे तर काही घरगुती नवसाच्या गणेशाचा देखील समावेश असतो.
- महेश नाईक, स्थानिक, उरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com