Dasara : विजयादशमीला वाहन खरेदीचा मुहूर्त, नऊ दिवसांत ९,५७२ गाड्या मालकांना सुपूर्द

car market
car marketEsakal

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः दसऱ्यानिमित्ताने घरात नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. त्याप्रमाणे गेल्या आठवड्यापासून मुंबईकरांनी खरेदीचे नियोजन केले होते. मंगळवारी वाहन खरेदीसाठी शोरूमपुढे नागरिकांची कुटुंबासह गर्दी दिसून आली. एकट्या मुंबईत गेल्या नऊ दिवसांमध्ये नऊ हजार ५७२ वाहनांची खरेदी झाली असून, अनेकांनी दसऱ्याच्या दिवशी वाहन घरी आणणे पसंत केले आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. गेल्या वर्षभरापासून नोंदणी केलेल्या नागरिकांनी आपल्या वाहनांची डिलिव्हरी दसऱ्याच्या मुहूर्तावरच करायची, असे ठरवल्याने मंगळवारी वाहनखरेदीला बरीच गर्दी दिसून आली. याच नऊ दिवसांमध्ये राज्यभरातसुद्धा सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आल्याचे परिवहन विभागाच्या वाहन संकेतस्थळावरील वाहन नोंदणीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.


मुंबई सेंट्रल, मुंबई पूर्व, मुंबई पश्चिम, बोरिवली आरटीओ कार्यालयात १६ ते २४ ऑक्टोबर यादरम्यान विविध प्रकारच्या एकूण नऊ हजार ५७२ वाहनांची खरेदी झाली आहे; तर राज्यभरात ८० हजार १८६ वाहनांची विक्री झाली असल्याचे परिवहन विभागाच्या वाहन संकेतस्थळावरून स्पष्ट होत असून, अनेकांनी दसऱ्याच्या दिवशीच वाहनाला घरी आणण्याचा मुहूर्त साधला आहे.

आकडेवारी १६ ते २४ ऑक्टोबर
आरटीओ कार्यालय - वाहन - परमीट
बोरिवली - २,०६७ - ३४१
मुंबई सेंट्रल - २,७१० - ४६२
मुंबई पूर्व - २,७४५ - ३८७
मुंबई पश्चिम - २,०५० - २६४
------------
राज्यातील वाहनखरेदीचे प्रकार
वाहन - संख्या
फोर व्हिलर - १६
अजवड मालवाहू वाहन - १,१७६
अवजड मोटार वाहन - ५७
अवज़ड प्रवासी वाहन - ४६
हलके मालवाहू वाहन - २,०११
हलके मोटार वाहन - १९,८६०
हलके प्रवासी वाहन - १,५५४
मध्यम मालवाहू वाहन - २२०
मध्यम मोटार वाहन - १३
मध्यम प्रवासी वाहन - ९५
इतर वाहने - २५८
थ्री व्हीलर - १
थ्री व्हीलर टॅक्सी परमीट - २,०२९
टू व्हीलर - ५२,८४०
------------------

वाहन फ्युएल प्रकार
सीएनजी - १,५८६
डिझेल - ८,२०१
डिझेल हायब्रीड - ३०
इलेक्ट्रिक - ६,०३६
एपीजी - २१२
पेट्रोल - ५४,५११
पेट्रोल सीएनजी - ६,१९६
पेट्रोल इथेनाॅल - १,६७४
पेट्रोल हायब्रिड - १,४०३
पेट्रोल एलपीजी - १

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com