दाऊद इब्राहिमच्या उर्वरित मालमत्तेचा लिलाव डिसेंबरमध्ये; इक्बाल मिरचीच्या मालमत्तांचाही लिलाव होणार

अनिश पाटील
Saturday, 14 November 2020

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा विश्वासू इक्बाल मिरची यांचा मालमत्तांचा लीलाव डिसेंबरमध्ये मुंबईत करण्यात येणार आहे. स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍सचेंज मॅनीपुलेशन ऍक्‍ट(सफेमा) अंतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्याचा विश्वासू इक्बाल मिरची यांचा मालमत्तांचा लीलाव डिसेंबरमध्ये मुंबईत करण्यात येणार आहे. स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍सचेंज मॅनीपुलेशन ऍक्‍ट(सफेमा) अंतर्गत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यात सहा मालमत्तांचा लिलाव झाला  पण तांत्रिक कारणामुळे एका मालमत्तेचा लीलाव होऊ शकला नाही.

शाळांकडून विद्यार्थ्यांचा डाटा लिक; बाह्य एजन्सीला माहिती पुरवल्यास कारवाई

दाऊदच्या कुटुंबियांशी संबंधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे या मालमत्ता आहेत. त्याती सहा मालमत्ता मुम्बाके या गावात आहेत. त्यात 27 गुंठे जमीन, 29.30 गुंठे जमीन, 24.90 गुंठे जमीन, 20 गुंठे जमीन, 18 गुठे जमीन तसेच 27 गुठे जमिनीसह एक घर अशा सहा मालमत्ता होत्या. त्यांचा लिलाव करण्यात आला होता. पण खेड परिरातच लोटे येथेही 30 गुंठ्यांची एक जागा आहे. तिचा लिलाव तांत्रिक कारणामुळे होऊ शकला नाही. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लीलाव करण्यात येणार आहे. त्याच्या आठवड्याभरापूर्वी लीलावात सहभागी होण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

'उशीरा सूचलेले शहानपण'! मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजप नेत्याची प्रतिक्रीया

दाऊदचा विश्वासू इक्‍बाल मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलावही करण्यात येणार आहे. दोन वेळा सफेममार्फत या मालमत्तेचा लीलाव करण्यात आला होता.  पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. सफेमाने या मालमत्तेची बेस किंमत तीन कोटी 45 लाख रुपये निश्‍चित केली होती. ही बेस किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन कॉ. हा.सो. मध्ये 501 व 502 हे दोन फ्लॅट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ 1200 चौ.फुट आहे.

David Ibrahims remaining property auctioned in December Iqbal Mirchis properties will also be auctioned

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: David Ibrahims remaining property auctioned in December Iqbal Mirchis properties will also be auctioned