Dawood Ibrahim
Dawood Ibrahimskal

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या २ मालमत्तांचा झाला लिलाव; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Dawood Ibrahim: मुंबई साखळी बॉम्बस्फोट घडवल्यानंतर दाऊद पाकिस्तानमधील कराचीमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते.मध्यंतरी त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याच्या जोरदार अफवा उठल्या होत्या.
Published on

Mumbai UnderWorld News: मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आणि वॉन्टेड आरोपी दाऊद इब्राहीम याच्याशी संबधित चार मालमत्ताचा लिलावाची प्रक्रीया शुक्रवारी पार पडली. यातील दोन मालमत्तांचा लिलाव पुर्ण झाला.

रत्नागिरी जिल्हातील खेड तालुक्यातील मुंबके या गावातील दाऊद इब्राहीम कासकरच्या कुटुंबियाशी संबधित चार मालमत्तांसाठी आज (ता.०५) मुंबईतील आयकर भवनात बोली लावण्यात आली. स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स (मालमत्ता जप्ती) कायदा (सफेमा) एनडीपीएस कायदा, १९८५ तसेच बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध कायदा या अंतर्गत, या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. (Dawood Ibrahim)

Dawood Ibrahim
Jalgaon Crime News : वन विभागाच्या कारवाईत 90 हजारांचे लाकूड जप्त; अंधाराचा फायदा घेत चालक वाहन सोडून पसार

मुंबके गावातील १७१ चौरस मीटरचा एक कृषी भूखंडासाठी सर्वात मोठी म्हणजे २ कोटीची यशस्वी बोली लावली गेली. तर १७३० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली दुसऱ्या एका शेतजमीनीसाठी ३.२८ लाख रुपयाची सर्वोच्च बोली लावली गेली. एकाच व्यक्तीच्या ताब्यात या दोन्ही मालमत्ता गेल्या आहेत. इतर दोन भूखंडासाठी कुणीही बोली लावली नाही. खरेरीदाराचे नाव सुरक्षेच्या कारणावरुन जाहिर करण्यात आले नाही.

दाऊद इब्राहीम कासकर आणि त्याच्या भावंडानी मुंबईत येण्यापुर्वी १९७० मध्ये मुंबके गावात आपले बालपण घालवले.मुंबई साखळी बॉम्बस्फोट घडवल्यानंतर दाऊद पाकिस्तानमधील कराचीमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते.मध्यंतरी त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याच्या जोरदार अफवा उठल्या होत्या.

Dawood Ibrahim
Mumbai Crime: मोठ्या भावाची लहान भावांकडून हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com