
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथे दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, गेल्या तीन वर्षांपूर्वी आम्ही विकासाचे थर रचून विकासाची हंडी फोडली, तर विरोधकांनी विकास-विरोधी हंडी उभी केली होती. मात्र, जनतेने ती हंडी फोडून विरोधकांना घरी बसवले