Crime News : घाटकोपरमध्ये नवविवाहित जोडप्याचे सापडले राहत्या घरात मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dead bodies of newly married couple found in house Ghatkopar crime police mumbai

Crime News : घाटकोपरमध्ये नवविवाहित जोडप्याचे सापडले राहत्या घरात मृतदेह

मुंबई : घाटकोपर येथील एक नवविवाहित जोडपे बुधवार, 8 मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी मृत अवस्थेत सापडले . दीपक शहा (40) आणि टीना शहा (35) असे जोडप्याचे नाव असून ते घाटकोपरच्या कुकरेजा टॉवर्समध्ये राहत होते. मृत्यू नंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात देण्यात आले आहे.

मृत जोडपे त्यांच्या नातेवाईकांनी मोबाईल फोनला उत्तर देत नव्हते. दारावरची बेल वाजवली असता घरातून प्रतिसाद येत नव्हता तेव्हा शेजारी राहणारे त्यांचे नातेवाईक नंतर डुप्लिकेट चावी वापरून त्यांच्या घरात प्रवेश केला गेले तेव्हा त्यांना हे जोडपे मृत अवस्थेत आढळले. जोडप्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

पंतनगर पोलिसांनी प्रथमदर्शनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांना घरात संशयास्पद काहीही सापडले नाही. बाथरूममध्ये शॉवर चालू होते जेथे ते सापडले. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. या प्रकरणात पंतनगर पोलीस वैद्यकिय अहवालाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :policecrime