सकाळ वृत्तसेवा
पनवेल : मृत झालेली महिला जिवंत असल्याचे भासवून तिच्या नावे व तिच्या मुलाच्या नावे असलेले पनवेल तालुक्यातील धोधाणी, वाघाची वाडी येथील कोट्यवधी रुपये किमतीचे दोन भूखंड एका टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.