
विरार : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते- मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ! अश्या सुरेश भटांच्या ओळीची आठवण विरार पूर्वेकडील स्मशानात झाली . मरणा नंतरही एका प्रेताला लाकडे नसल्याने तब्ब्ल तीन तास तिष्ठत राहावे लागले होते. विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील स्मशानभूमीत लाकडाचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने स्थानिक नागरिक अडचणीत आले आहेत. रणजीत सदा यांच्या आजोबांचे नुकतेच रुग्णालयात निधन झाल्यानंतर, कुटुंब अंत्यसंस्कारासाठी फुलपाडा स्मशानभूमीत पोहोचले, परंतु तेथे लाकूड उपलब्ध नव्हते. कुटुंब सुमारे तीन तास भटकत राहिले, अखेर त्यांना विरार पश्चिमेहून लाकूड आणावे लागले, ज्यासाठी त्यांना टेम्पो भाडे म्हणून ५०० रुपये द्यावे लागले.पालिकेच्या अश्या धोरणाचा नागरिकांना फटका बसत आहे.