कोरोनामुळे मृतांची संख्या वाढल्याने आता विद्युत दाहिन्यांवर भार

funeral
funeral

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित मृतांची संख्या वाढल्याने विद्युत दाहिन्यांवर भार पडत आहे. तांत्रिक बिघाड होऊन विद्युत दाहिन्या बंद पडत असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. 

मुंबईत केवळ 11 विद्युत दाहिन्या आहेत. दररोज 55 ते 60कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याने विद्युत दाहिन्या 24 तास सुरू असतात. त्यामुळे चिमण्या तापत असल्याने विद्युत दाहिन्या बंद पडण्याची शक्यता असते. मुंबईत 54 ठिकाणी महापालिकेच्या 71 स्मशानभूमी असून, त्यापैकी 11 ठिकाणी विद्युत दाहिन्या आहेत. शिवाजी पार्क, शीव आणि इतर काही ठिकाणी विद्युत दाहिन्या आता पीएनजीवर चालवल्या जातात. त्यामुळे या सर्व ठिकाणी एकूण 19 विद्युत व पीएनजी आधारित शवदाहिन्या आहेत. 

विद्युत व गॅस दाहिन्यांची दिवसभरात 144 मृतदेहांचे दहन करण्याची क्षमता आहे. विद्युत दाहिनीत एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी अडीच तास लागतात. पूर्वी चार ते पाच मृतदेहांचे दहन केले जात होते. आता कोरोनामुळे विद्युत दाहिन्या 24 तास सुरू ठेवाव्या लागतात. त्यामुळे चिमण्या थंड होत नसल्याने बिघाडाची शक्यता वाढल्याचे समजते.

as the death toll from the corona increases, the load on the electric funeral

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com