पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड..  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोना विषाणूमुळे मोठी दहशत निर्माण झालीये. भारतातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतायत. मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत.

पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोना विषाणूमुळे मोठी दहशत निर्माण झालीये. भारतातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतायत. मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत. अशात पावसाळा सुरु झालाय. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार बळावतात.

वातावरणातील बदल आणि दमटपणा यामुळे व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. केवळ व्हायरल इन्फेक्शन नाही तर पोटाशी निगडित आजार देखील पावसाळ्यात होऊ शकतात. यामध्ये कॉलरा, डायरिया किंवा जुलाब हे पाण्यामुळे होणारे आजार प्रामुख्याने पाहायला मिळतात. अशात कोरोनाशी लढता लढता या आजारांशी देखील आपल्याला काळजी घायची आहे.   

BIG NEWS - दहावी बारावीच्या निकालाची तारिख ठरली? या तारखेपर्यंत होणार जाहीर; वाचा

यासाठी डॉक्टर सर्वात आधी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सल्ला देतात. पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी शुद्ध पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात अनेकदा गढूळ पाण्यामुळे आपल्याला आजार होत असतात. म्हणून पाणी उकळून थंड करून पिणे सर्वात महत्त्वाचं आहे. हिवाळ्यात आणि पावसायात जास्त पाणी पिणं होत नाही, मात्र पावसाळ्यात भरपूर पाणी पिणे अत्यन्त महत्त्वाचं आहे. पाण्यासोबतच आपल्या शरीरात प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन्स जातील यावर देखील लक्ष ठेवायला हवं. कारण यामुळेच आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे रोगप्रतिकारक शक्ती तयार होऊ शकते. आलं, लसूण, हळद, गाजर या गोष्टींचा आपल्या अन्नात समावेश करा. त्याचसोबत सी व्हिटॅमिनसाठी आपल्या आहारात लिंबाचा समावेश ठेवा.   

अनेकदा आपल्याला पावसाळ्यात बाहेर फिरायला जावसं वाटतं. आपण जातोपण. अशावेळी बाहेर खाणं होतं. आपण जिथे खाणार आहोत तिथे हायजिनीक आहे ना याची खात्री करा. पावसाळ्यात बाहेरचं अन्न खाणं टाळा. उघड्यावरील किंवा ज्यावर माश्या बसलेलं अन्न अजिबात खाऊ नका. यातूनच विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यात अर्धवट शिजलेलं अन्न खाल तर त्याचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो. 

BIG NEWS - मादक सौंदर्याची व्याख्या सांगणारी 'बिकिनी' अशी आली जन्माला..

पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. कारण पावसासोबत आपल्या घरात बॅक्टरीया आणि व्हायरस शिरकाव करू शकतात. त्यामुळे स्वतःची, घराची आणि आपच्या परिसराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या घराच्या आसपास काही डबे किंवा टायर्स किंवा अशा काही जागा असतील जिथे पावसाचं पाणी साचतंय, तर या जागा म्हणजे डेंगीच्या डासांची पैदास होण्यासाठी अगदी योग्य जागा आहेत. अशा जागांची नीट साफसफाई करणं गरजेचं आहे.

पावसाळा सुरु होण्या आधीच आपल्या डॉक्टरांशी एकदा संपर्क साधून घरामध्ये कोणती औषधं असावीत याची एक यादी बनवून ही औषध आणून ठेवा. घरात मच्छरदाण्या, किंवा डासांपासून आपला बचाव करतील अशी औषधं किंवा क्रीम्स सोबत ठेवा. याचसोबत पावसाळ्यात सुके कपडे घाला. नाहीतर अंगावर रॅश येण्यासारखे आजारही होऊ शकतात.  याचसोबत पावसाळ्यात घरातच हलका व्यायाम करणं फायदेशीर राहील. 

full guide to stay away from various viral infections comes with monsoon

टॅग्स :India