esakal | जागतिक एड्स दिन: कोरोनात HIVचाचणीत घट, मुंबई पालिकेची मितवा मोहिम
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक एड्स दिन: कोरोनात HIVचाचणीत घट, मुंबई पालिकेची मितवा मोहिम

कोरोनाच्या सात महिन्याच्या कालावधीत 2 लाख 24 हजार चाचण्यांचे उद्दिष्ट्य असताना निव्वळ 83 हजार 190 चाचण्या झाल्या. यात एचआयव्हीचे 803 रुग्ण आढळून आले. या आकडेवारीवरुन 62.86 टक्के घट झाली असल्याची माहिती 1 डिसेंबर या आजच्या जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं देण्यात आली.

जागतिक एड्स दिन: कोरोनात HIVचाचणीत घट, मुंबई पालिकेची मितवा मोहिम

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनाच्या सात महिन्याच्या कालावधीत 2 लाख 24 हजार चाचण्यांचे उद्दिष्ट्य असताना निव्वळ 83 हजार 190 चाचण्या झाल्या. यात एचआयव्हीचे 803 रुग्ण आढळून आले. या आकडेवारीवरुन 62.86 टक्के घट झाली असल्याची माहिती 1 डिसेंबर या आजच्या जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं देण्यात आली.

याबाबत मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका (एमडैक्स) डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले की, ‘लॉकडाउनच्या पहिले तीन महिने रुग्णालय ओपीडी बंद होती, केवळ ताप आणि एचआयव्ही रुग्णांसाठी एआरटी केंद्र सुरु होते. लॉकडाऊनमुळे बरेच रुग्ण रुग्णालयापर्यंत पोहचू शकले नाही, ज्यामुळे चाचणीत घट झाली आहे. जोपर्यंत स्थिती सुरळीत होत नाही चाचण्यांमध्ये वाढ की घट हे त्यावेळी समजू शकेल असे स्पष्ट केले. मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्था (एमडैक्स) सातत्याने प्रयत्न करत असल्याने मुंबई शहरात एचआयव्ही रुग्णांची संख्या घटली असल्याचे चित्र ही दिसून आले.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मागील काही महिन्यांपासून एचआयव्ही रुग्णांचा घटता आलेख दिसून येत आहे. एप्रिल 2015 ते मार्च 2020 पर्यंत 41 टक्के रुग्णसंख्या घटली असल्याचे समोर आले आहे. तर मुंबईमध्ये 2015-16 मध्ये 2.8 लाख लोकांची एचआयव्ही स्क्रीनिंग झाली. यात वर्ष 2019- 2020 मध्ये चाचणीचा आकडा दुप्पट झाला. हा आकडा 4.8 लाखावर पोहोचला. तसेच मागील पाच वर्षात नवीन रुग्णांची संख्या घटली असून ही संख्या 7, 592 होती तर 4473 एवढी झाली आहे. सध्या 36, 580 लोक एचआयव्ही रुग्ण आहेत. महिला सेक्स वर्कर(एफएसडब्ल्यू) आणि एमएसएम संबंध आणि तृतीयपंथी मधील एचआयव्ही संक्रमणाचा धोका अधिक असतो.

अधिक वाचा-  योगी आदित्यनाथ आज मुंबई भेटीवर! उद्योगसमूहांशी चर्चा करणार

सद्यस्थितीत असुरक्षित संबंधामुळे होणारे एचआयव्ही संक्रमित प्रमाणातही घट झाली आहे. ही घट 93.1 टक्के झाली असल्याचे मुंबई जिल्हा एडस संस्थेकडून सांगण्यात आले. मागील तीन वर्षात एफएसडब्ल्यू (1.9%), एमएसएम (24.7%) आणि ट्रांसजेंडर (65%) मध्ये घट झाली असल्याची माहिती संस्थेने दिली.

पालिकेची ‘मितवा’मोहिम

एचआयव्ही बरोबर जीवन जगत असलेले 12 ते 18 वर्षाच्या मुलांचे आयुष्यामध्ये नवी दिशा दाखवण्यासाठी वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे. यात आई-वडील एचआयव्ही संक्रमित असल्याने त्यांचे संक्रमण मुलांना होते, या मुलांना जन्मापासूनच औषधे दिली जातात. ही मुले जेव्हा मोठी होतात.  त्यावेळी त्यांना देत असलेल्या औषधांबाबत पालकांकडे विचारणा करतात. पालकांकडे मुलांच्या प्रश्नांची उत्तर नसतात आणि काही वेळा पालक सत्य परिस्थिती मुलांना सांगतात. ज्यामुळे लहान वयातच मुलांचा समाज आणि पालकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. ही परिस्थिती टाळणे आणि मुलांना नवी दिशा दाखवण्यासाठी एआरटी सेंटरमध्ये वर्कशॉप सुरु करण्याची योजना मुंबई जिल्हा एडस नियंत्रण संस्था करत आहे. 1 डिसेंबरला एडस दिनानिमित्त 100 किशोरवयीन मुलांना बोलवण्यात आले असून या मुलांबरोबर चर्चा करण्यात केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या शंकेची निरासन करण्यात येणार आहे.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

December 1 World AIDS Day Special Mumbai bmc Mitwa Campaign

loading image