esakal | डिसेंबर अखेरीस वाढणार धोका? टास्क फोर्समधल्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

डिसेंबर अखेरीस वाढणार धोका? टास्क फोर्समधल्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

टास्क फोर्समधल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबर अखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

डिसेंबर अखेरीस वाढणार धोका? टास्क फोर्समधल्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: दिवाळीनंतर राज्यासह मुंबईत कोरोनाचा धोका वाढेल अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र समाधानकारक बाब म्हणजे, तज्ज्ञांनी वर्तवलेल्या निरीक्षणानुसार राज्यासह मुंबईच्या रुग्णसंख्या आणि मृत्यूदरात तितकी वाढ झाली नसल्याचे समोर आले आहे. आता टास्क फोर्समधल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबर अखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सामान्यांसह यंत्रणांनीही याविषयी सर्तकता बाळगली पाहिजे.

राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र राज्यातील तापमानात घट झाल्यास शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यापूर्वी मे, जून आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली होती.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईतील 2 हजार 250 कोरोना बाधित रुग्णांची दुहेरी नोंद गेल्या बुधवारी केंद्र शासनाच्या आयसीएमआर संकेतस्थळावर करण्यात आली होती. ही संख्या कमी केल्यामुळे मुंबई पालिका आणि राज्याच्या प्रगतीपर रुग्णसंख्येमध्ये आणि बरे झालेल्या रुग्णसंख्येत बदल झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर चाचण्याची क्षमता वाढवली असून रुग्णांच्या सहवासितांच्या शोधावरही भर दिला आहे.

महत्त्वाची बातमी-  अडचणी वाढणार ? शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना तिसरा समन्स

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

December chances increase corona patients Opinions medical experts

loading image