मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली, संपूर्ण शहरात अतिशय वाईट हवेची नोंद

मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली, संपूर्ण शहरात अतिशय वाईट हवेची नोंद

मुंबई: 2020 या सरत्या वर्षातही मुंबईची हवा प्रदूषित झाल्याचे दिसून आले आहे. 31 डिसेंबर या दिवशी सफर संस्थेने नोंद केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील हवा अतिशय प्रदूषित झाली आहे. 

मुंबईत अनलॉक व्हायला सुरूवात झाली आहे. गाड्यांची वाढलेली वर्दळ त्यामुळे, वाढलेले प्रदूषण, त्यात मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून थंडी पडू लागली आहे. त्याचा ही परिणाम मुंबईच्या हवेवर झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील प्रदूषण कमालीचे कमी झाले होते. पण आता पुन्हा हवेची पातळी खालावली आहे. 

नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात मुंबईकरांना थंडीची चाहूल लागते. सकाळी आणि संध्याकाळी तसं वातावरण ही मुंबईकर अनुभवत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा प्रदूषित झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई या संपूर्ण शहराची हवा अतिशय वाईट असल्याची नोंद सफर प्रणालीने केली आहे. शहरातील बीकेसी म्हणजेच वांद्रे-संकुल या परिसरात अतिशय वाईट दर्जाची गेल्या चार दिवसांपासून आहे. परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 313 ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) एवढा नोंदवण्यात आला आहे. 

कुलाब्यात मध्यम स्वरुपाच्या 119 ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) हवेचा निर्देशांक नोंद करण्यात आला. माझगाव, अंधेरी या परिसरात अतिशय वाईट दर्जाची हवा असून अनुक्रमे 345 आणि 308 ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) एवढा नोंदवण्यात आला आहे. वरळी, बोरीवली आणि चेंबूरमध्ये अतिशय वाईट अनुक्रमे 200, 262आणि 311 असा ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) हवेचा निर्देशांक नोंद करण्यात आला आहे. नवी मुंबईत मध्यम स्वरुपाची हवा नोंद करण्यात आली असून 354 ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) एवढा निर्देशांक नोंद करण्यात आला आहे.

बीकेसीतील हवा अतिशय वाईट

मुंबई उपनगराच्या अनेक परिसरातील हवा ही गुरुवारी वाईट दर्जाची असल्याची नोंद सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणालीने केली आहे. बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला संकुल या परिसरातील हवा या वातावरणातही अतिशय वाईट नोंदवण्यात आली आहे. या परिसरात वातावरण सर्वांधिक प्रदूषित नोंदवण्यात आलं असून हवेची गुणवत्ताही खालावली.

हवेची गुणवत्ता खालीलप्रमाणे

संपूर्ण मुंबई शहर 313 ऐक्यूआय म्हणजेच अतिशय वाईट पीएम 2.5

  • कुलाबा - मध्यम 119 ऐक्यूआय पीएम 10
  • मालाड 300 ऐक्यूआय पीएम 2.5 अतिशय वाईट
  • माझगाव - 345 ऐक्यूआय पीएम 2.5 अतिशय वाईट
  • वरळी - वाईट ऐक्यूआय 200 पीएम 2.5
  • बोरीवली - वाईट ऐक्यूआय 262 पीएम 2.5
  • बीकेसी - अतिशय वाईट ऐक्यूआय 362 पीएम 2.5
  • चेंबूर - अतिशय वाईट ऐक्यूआय 312 पीएम 2.5
  • अंधेरी -अतिशय वाईट ऐक्यूआय 308 पीएम 2.5
  • नवी मुंबई - अतिशय वाईट ऐक्यूआय 353. पीएम 2.5

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

December Mumbai air quality deteriorated Very bad weather recorded entire city

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com