
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यानुसार मुंबई आणि परिसरातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात यासाठी शिक्षक, पालक आग्रही आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात याबाबत स्पष्टता येईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांने सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील काही भागातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याने शाळेत विद्यार्थांची उपस्थिती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील शाळा सुरू करण्यासाठी पालक, शिक्षक आग्रही झाले आहेत. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे महत्वाचे वर्ष असल्याने त्यांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थी घरी राहून कंटाळले आहेत. कोरोना रुग्ण कमी झाल्याने शाळा सुरू करण्याविषयी महापालिकेच्या शिक्षण विभागासह शाळा, प्राध्यापक आणि पालकांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. त्यानुसार नवीन वर्षात 1 जानेवारीपासून मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि काही अन्य जिल्हे वगळता इतर भागात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यत राज्यभरातील सुमारे 10 लाख विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. मुंबई परिसरात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक असल्याने या भागातील शाळा सुरू झाल्या नव्हत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भितीमुळे पालकांसह शिक्षकही शाळा सुरू करण्यास तयार नव्हते. मात्र कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये घट होत असल्याने शाळा सुरू करण्यास तयारी दर्शविण्यात येत आहे.
शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागात चर्चा सुरू आहे. परंतु परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेतला जाईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. पुढील आठवड्यात शाळा सुरू होणार की नाही याविषयी स्पष्टता येणार येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
Decided to start school next week in mumbai
-------------------------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.