
युतीबाबत इतर लोकांना काय बोलायचे आहे त्यांनी बोलावे, पण युतीबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत आपण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये युतीच्या बैठका सुरू आहेत. युतीच्या बैठकीबाबत काहीही होऊ शकेल. एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून या बैठकीत युतीबाबत अंतिम निर्णय होईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगत आपणच युतीबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.
- मंत्रिमंडळात झाले 37 मोठे निर्णय; निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन निर्णयांचा धडाका
श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर युतीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. युतीबाबत इतर लोकांना काय बोलायचे आहे त्यांनी बोलावे, पण युतीबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत आपण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- सांगली : भाजपची घमेंड उतरवू; युती तोडण्याचा शिवसैनिकांचा इशारा
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आदित्य यांचा ही एक दिवस राहुल गांधी होईल, अशी टीका केली होती. यावर बोलतांना 'प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवेसी यांच्यावर बोलावे' असा सल्ला दिला.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांबाबत कोणी वेडेवाकडे करेल असे वाटत नाही, म्हणून मी आतापर्यंत काही बोललो नाही, असंही त्यांनी स्पष्ट करत सावध भूमिका घेतली. देशातील घुसखोर बांगलादेशी आहेत, त्यांना देशाच्या बाहेर काढायलाच हवे, कोणी त्यांना मांडीवर बसविण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनी बसवावे, अशी टिप्पणी ही त्यांनी केली.