पालघरमधील आश्रमशाळा होणार सुरु

शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडून निर्णयाचे स्वागत; पालकांना दिलासा
Palghar School
Palghar Schoolsakal
Updated on

मुंबई : कोरोना (Corona) संकटामुळे गेल्‍या दीड वर्षांपासून शाळा-महाविद्यालये (School-College) बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील (Rural Area) विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्‍याने शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निर्णयाचे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून पालकांना (Parents) दिलासा मिळाला आहे. (Decision-making welcome from students, including teachers Consolation to parents)

आदिवासी एकात्मिक प्रकल्प डहाणूतर्फे चालवण्यात येत असलेल्या सुमारे ३४ आश्रमशाळा व अनेक संस्थांमार्फत चालवण्यात येत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा लवकरच सुरू होत आहेत. यामध्ये संस्थांमार्फत चालवण्यात येत असणाऱ्या अनुदानित आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. शासकीय आश्रमशाळा अजूनही निवासी व्यवस्था नसल्याने त्याचबरोबर सेंट्रल किचनमधून मिळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था कार्यान्वित न झाल्याने काही प्रमाणात सुरू झाल्या आहेत. आश्रम शाळेत राहणारे विद्यार्थी सध्या शाळेत आहेत.

Palghar School
रंगकर्मींच्या मागण्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार- अमित देशमुख

डहाणू आदिवासी प्रकल्पांतर्गत वरवाडा, सवणे, धामणगाव, दाभाडी, उर्से, नानिवली, वसा, कांबळगाव या आश्रमशाळा सुरू झाल्या आहेत. निवासी व्यवस्था अजून सुरू नसल्याने सुमारे ५० टक्‍के विद्यार्थी शाळेत येत आहेत.ऑनलाईन शिक्षण सध्या सुरू आहे, पण ग्रामीण भागातील अनेक गरीब पालकांकडे मोबाईल नाहीत. त्याचबरोबर अनेक ग्रामीण खेड्यापाड्यांत नेटवर्क उपलब्ध नाही. त्‍यामुळे लवकरात लवकर निवासी आश्रमशाळा सुरू कराव्यात, अशी मागणी सूर्यानगर येथील कृष्णा डोकफोडे यांनी केली आहे.

Palghar School
सकाळी ६.३० पासून रेल्वे पास मिळविण्यासाठी डोंबिवली स्थानकात नागरिकांची गर्दी

कोरोनाचे सर्व नियम पाळून सरकारी

अनुदानित आश्रमशाळा लवकर सुरू करण्याचा विचार आहे. सरकारी आश्रम शाळांच्‍या बाबतीत अजूनही निवासी व्यवस्था, सेंट्रल किचन बाबतीत काही समस्या आहेत. या लवकरच दूर करून आश्रमशाळांमधील शिक्षण

लवकरच सुरू होईल. त्‍यासाठी पूर्वतयारी झाली आहे.

- असिमा मित्तल, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी, डहाणू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com