नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्याबाबत अमित देशमुख यांची महत्त्वाची माहिती

सुमित बागुल
Tuesday, 6 October 2020

महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनीही लवकरच राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरु करण्याचे संकेत दिलेत.   

मुंबई : कालच महाराष्ट्रातील बार आणि रेस्टॉरंट्स सुरु झाली आहेत. तब्बल सहा महिन्यांपासून बंद असलेली रेस्टॉरंट्स आणि बार्स सुरु झाल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पन्नास टक्क्यांचा फॉर्म्युला वापरत राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार्सला व्यवसाय सुरु करण्यात परवानगी मिळाल्याने रेस्टॉरंट्स आणि बार मालक त्यासचोबत नागरिकही खुश आहेत. 

अशात आता चर्चा होतेय ती मुंबई आणि महाराष्ट्रातील नाट्यगृहं आणि सिनेमागृहांबाबत. एकीकडे केंद्राने सिनेमागृह सुरु करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनीही लवकरच राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरु करण्याचे संकेत दिलेत.   

महत्त्वाची बातमी : सुशांतच्या मुंबईतील प्रॉपर्टीसाठी घरच्यांनीच त्यावर दबाव टाकला का ?

काय म्हणालेत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख ? 

महाराष्ट्रातील सिनेमागृह आणि नाट्यगृह मालकांकडून सिनेमागृह आणि नाट्यगृह लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी होतेय. पुढील काही महिने हे सिनेमागृहांसाठी कमाईचा मोसम असतो त्यामुळे लवकरात लवकर सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरु करण्याची परवानगी मागितली जातेय. या अनुषंगाने सध्या राज्य सरकारची महाराष्ट्रातील सिनेमागृह आणि नाट्यगृह मालकांशी चर्चा सुरु आहे. राज्य सरकार महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरु करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचंही अमित देशमुख म्हणाले. त्यामुळे पुढील काही दिवसांतच सिनेमागृह आणि नाट्यगृहांबाबत चित्र स्पष्ट होईल असंही सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं.

decision to start theaters in mumbai and maharashtra will be taken soon says amit deshmukh


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision to start theaters in mumbai and maharashtra will be taken soon says amit deshmukh