esakal | महाराष्ट्रात 'या' वयोगटासाठी लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Covide Vaccine

महाराष्ट्रात 'या' वयोगटासाठी लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रात १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठीचे (Maharashtra vacciantion) लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी आज जाहीर केले. "लस उपलब्ध नाहीय. फक्त दोन कंपन्यांकडूनच सध्या लस मिळतेय. ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी भारताने राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम सुरु केलाय. त्याचा दुसरा डोस भारत सरकार देऊ शकत नाही" असे राजेश टोपे म्हणाले. (In Maharashtra vacciantion For 18 to 44 age group will stop)

"कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस दोन महिन्यात आणि कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर एक महिन्यात दुसरा डोस घ्यावा लागतो. दुसरा डोस वेळेवर घेतला नाही, तर पहिल्या डोसच्या परिणामाचा उपयोग होणार नाही. म्हणून १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसी ४५ पुढील वयोगटासाठी वापरण्याचा निर्णय घेतलाय" असे राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा: महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार?

"१८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण आपण स्थगित करत आहोत. २० मे नंतर आम्ही दीडकोटी डोसेस प्रतिमहिना देऊ" असे आदर पुनावाला यांनी सांगितल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली.

loading image
go to top