esakal | कळवा, मुंब्य्रातील कोविड सेंटरला लागणार टाळे; म्हाडाने भाडे मागितल्याने महासभेने घेतला निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

कळवा, मुंब्य्रातील कोविड सेंटरला लागणार टाळे; म्हाडाने भाडे मागितल्याने महासभेने घेतला निर्णय

म्हाडा मार्फत उभारण्यात आलेल्या कळवा आणि मुंब्रा येथील कोवीड सेंटर अवघ्या तीनच महिन्यात बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला आहे

कळवा, मुंब्य्रातील कोविड सेंटरला लागणार टाळे; म्हाडाने भाडे मागितल्याने महासभेने घेतला निर्णय

sakal_logo
By
migrator

ठाणे  : म्हाडा मार्फत उभारण्यात आलेल्या कळवा आणि मुंब्रा येथील कोवीड सेंटर अवघ्या तीनच महिन्यात बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला आहे. म्हाडा येथे केवळ रुग्णालय उभारले असून त्याठिकाणी लागणारे मनुष्यबळ, साहित्य, जेवण, मेडीसीन, ऑक्सीजन आदींसह इतर पुरवठा ठाणे  महापालिका आपल्या खर्चातून करीत आहे. असे असतांना तीन महिन्यानंतर या दोन्ही रुग्णालयांचे 2 कोटी 33 लाखांचे भाडे म्हाडाने मागतिले असल्याने हे कोवीड सेंटरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहराचा कोरोनाचा प्रादरुभाव वाढत असतांना कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णांना देखील ठाण्यात धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे कळव्यात आणि मुंब्य्रातही म्हाडाच्या मार्फत रुग्णालये उभारण्यात आले होती. तीन महिन्यापूर्वी ही रुग्णालये उभारण्यात आली होती. म्हाडाच्याच जागेवर ही रुग्णालये तयार करण्यात आली होती. त्यानुसार कळवा येथे 400 आणि मुंब्रा येथे 410 असे एकूण 810 बेड या दोन्ही रुग्णालयांमध्ये होते. याची निगा देखभाल, याठिकाणी लागणारे डॉक्टरांसकट इतर मनुष्यबळ महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्यात आले होते. तसेच त्यांचा खर्चही महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याशिवाय येथील साफसफाई, इतर कर्मचारी, मेडीसीन, ऑक्सीजन आदींसह इतर साहित्याचा पुरवठा देखील महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. यासाठी पालिकेने आतार्पयत कोटय़ावधींचा खर्च केलेला आहे. त्याचा येथील रुग्णांना फायदा देखील झाला आहे. शेकडो रुग्णांनी या दोन्ही रुग्णालयातून उपचार घेत कोरोनावर मात केली आहे.

ऑफलाईनला प्रतिसाद, पण ऑनलाईन कोर्टही हवे; बॉम्बे बार असोसिएशन आणि अन्य संघटनांचे निवदेन

दरम्यान शुक्रवारी झालेल्या महासभेत या रुग्णालयांच्या ठिकाणी लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन पुरविणो आणि हाऊसकिपींग पुरविणो असे दोन प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने चर्चा करतांना एवढा सगळा खर्च आपण करीत असतांना आता पुन्हा म्हाडाने जे काही स्ट्रक्चरल उभे केले आहे, त्याचे भाडे मागितले आहे, त्या भाडेही आपण का द्यावे असा सवाल  राम रेपाळे यांनी केला. या दोन्ही रुग्णालयांसाठी 2 कोटी 33 लाखांचे भाडे म्हाडाने मागतिले असून सध्या पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने हे रुग्णालयच बंद करावीत असा ठराव त्यांनी मांडला त्याला अनुमोदन देण्यात आले. तसेच महापौरांनी देखील आपण भाडे का द्यावे असा सवाल करीत हे दोनही रुग्णालये बंद करावीत असे आदेश प्रशासनाला दिले.

The decision was taken by the general body after MHADA asked for rent in kalawa and mumbra

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image