ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, दिवसभरात ८५३ नव्या रुग्णांची भर

राहुल क्षीरसागर
Thursday, 29 October 2020

 ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.  ठाणे जिल्ह्यात बुधवारी 853 कोरोना रुग्णांसह 15 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 2 लाख 9 हजार 138 तर, मृतांची संख्या आता 5 हजार 276 झाली आहे.

मुंबईः  ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.  ठाणे जिल्ह्यात बुधवारी 853 कोरोना रुग्णांसह 15 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 2 लाख 9 हजार 138 तर, मृतांची संख्या आता 5 हजार 276 झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत 219 बाधितांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 45 हजार 949 तर, मृतांची संख्या 1 हजार 141 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 181 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. कल्याण डोंबिवलीत 197 रुग्णांसह 1 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये 66 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

अधिक वाचाः  आरोग्य सुविधांची दैना! जव्हारच्या पिंपळशेतमधील आरोग्य निवासी केंद्र ओस 

भिवंडी महापालिका क्षेत्रात 13 बाधितांची तर, 1 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात झाली. तसेच उल्हासनगर 23 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये 33 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, बदलापूरमध्ये 48 रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 73 रुग्णांची तर, 2 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 16 हजार 647 तर, मृतांची संख्या 516 वर गेली आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दरात दिवसेंदिवस वाढ

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत हा दर 144 दिवसांवर गेला आहे. तर 27 ऑक्टोबरपर्यंत एकूण 14,84,306  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.48 इतका आहे.

मुंबईत बुधवारी 1,354 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,54,242 झाली आहे.  मुंबईत बुधवारी 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,153 वर पोहोचला आहे. मुंबईत काल 1,354 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,24,217 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे.

अधिक वाचाः  सुशांतच्या बहिणींविरोधात रियानं केलेले आरोप निव्वळ अंदाज- सीबीआय

मुंबईत बुधवारी नोंद झालेल्या 31 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 17 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी 3 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 28 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Decrease number corona heart disease patients Thane district adding 853 new patients day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease number corona heart disease patients Thane district adding 853 new patients day