मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांत घट; दादर, माहीम, धारावी हे हॉटस्पॉट पूर्ण नियंत्रणात

मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांत घट; दादर, माहीम, धारावी हे हॉटस्पॉट पूर्ण नियंत्रणात

मुंबई : मुंबईतील सर्वच प्रभागांतील कोव्हिड रुग्णवाढीचा दर 0.50 टक्‍क्‍यांच्या खाली आहे; तर संपूर्ण शहराचा रुग्णवाढीचा दर 0.29 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. तीन महिने मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या जी उत्तर, दादर, माहीम, धारावी परिसरातील कोव्हिड रुग्णांच्या वाढीचा दर सर्वांत कमी 0.16 टक्के आहे. सर्वाधिक दर गोरेगाव पी दक्षिण प्रभागात 0.37 टक्के आहे. 

ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील कोव्हिड नियंत्रणात येऊ लागला होता. ऑक्‍टोबरच्या शेवटी शहरातील सात प्रभागांत रुग्णवाढीचा दर 0.50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होता; मात्र आता सर्वच विभागांतील वाढीचा दर 0.50 टक्‍क्‍यांच्या खाली आहे. 29 ऑक्‍टोबरला मुंबईतील कोव्हिड वाढीचा दर 0.44 टक्के होता. 7 नोव्हेंबरला 0.29 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. 

आठवडाभरात कोव्हिड वाढीच्या दरात सर्वाधिक घट ही काळबादेवी, मरिन लाईन्स, गिरगाव या सी प्रभागात झाली आहे. 29 ऑक्‍टोबरला या प्रभागात कोव्हिड वाढीचा दर 0.54 टक्के होता, तर 7 नोव्हेंबरला हा दर 0.17 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. जी उत्तर प्रभागाचा दर 0.35 टक्‍क्‍यांवरून 0.16 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आहे. मुंबईतील अंधेरी, जोगेश्‍वरी पश्‍चिम, के पश्‍चिम, कांदिवली आर दक्षिण, बोरिवली आर मध्य, गोरेगाव पी दक्षिण, सी प्रभाग, चेंबूर एम पश्‍चिम, वांद्रे सांताक्रुझ पश्‍चिम, एच पश्‍चिम या प्रभागातील कोव्हिड वाढीचा दर 0.50 टक्‍क्‍यांच्या वर होता. 

कोव्हिड वाढीचा दर 
प्रभाग 7 नोव्हेंबर 29 ऑक्‍टोबर 
पी दक्षिण 0.38 0.54 
बोरिवली 0.37 0.54 
एम पश्‍चिम 0.36 0.53 
आर दक्षिण 0.33 0.56 
एच पश्‍चिम 0.30 0.50 
के पश्‍चिम 0.27 0.58 
सी 0.17 0.54 

Decrease in patients in Mumbai Hotspots Dadar, Mahim, Dharavi are under complete control

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com