
नागपूर : आदित्य ठाकरे यांनी त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून शिवसेना संपवायला लावली आणि ते काँग्रेससोबत गेले. त्यांच्यामुळे युती तुटली, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. शालेय गणवेशात दीपक केसरकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर दणकून टीका केली.