दीपक कोचर यांना सक्तवसूली संचलनालयाने केली अटक; दुपारपासून सुरू होती चौकशी

अनिश पाटील
Monday, 7 September 2020

आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व विशेष कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) सोमवारी अटक केले.

मुंबई : आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व विशेष कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) सोमवारी अटक केले. अटकेपूर्वी ईडीने त्यांनी दुपारपासून चौकशी केली होती. ईडीने याप्रकरणी मुंबई व औरंगाबाद येथील 12 ठिकाणी छापे टाकले होते. 

तारापूरात कारखान्यातून रसायनाची गळती, विषारी वायूमुळे महिलेसह 6 कामगारांना बाधा

चंदा कोचर या बॅंकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ असताना, त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला पदाचा गैरवापर करत 3250 कोटींचे कर्ज दिले. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितले आणि त्याचा फायदा घेतला, असा त्यांच्यावर आरोप होता. उद्योगपती वेणूगोपाप धूत आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोपर यांनी एकत्र येऊन नूपावर रिन्यूवेबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्याशिवाय व्हीडीओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यातील 86 टक्के रक्कम म्हणजेच दोन हजार 810 कोटी रुपये देण्यात आलेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये या कर्जाला बुडीत घोषित करण्यात आले होते. 

नूपावरमध्ये दीपक कोचर व धूत यांचे 50-50 टक्के भागिदारी होती. दीपक कोचर यांना या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनावण्यात आले होते. त्यानंतर धूत यांनी या कंपनीचे संचालक पद सोडले. धूत यांनी आपले अडीच लाख रुपयांमध्ये 24 हजार 999 शेअर्स न्यूपावरवर हस्तांतरीत केले होते. 

तर कंगना रानौतला व्हावे लागणार क्वारंटाईन! वाचा मुंबईच्या महापौरांची प्रतिक्रीया

दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने सहाय्य करावे यासाठी हे कर्ज देण्यात आले, या आरोपांमुळे चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हाच ठपका या गुन्ह्यातही कोचर यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे. तसेच कर्जाची रक्कम देताना नियमावलीचे पालन झाले नसल्याचा आरोप आहे

--------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepak Kochhar arrested by Directorate of Recovery; The inquiry started from noon