चौकशीदरम्यान NCBच्या अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली दीपिका पदुकोण

पूजा विचारे
Sunday, 27 September 2020

साडेपाच तास चाललेल्या या चौकशी दरम्यान दीपिका अधिकाऱ्यांसमोर तीन वेळा रडल्याचं समजतंय. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला चांगलंच खडसावल्याचंही माहिती समोर आली आहे.

मुंबईः अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन जप्त केलेत.  ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून शनिवारी दीपिका पदुकोणची चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या विशेष पथकाने कुलाबा येथील विश्राम गृहावर  दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या पाच अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केल्याचं समजतंय. 

साडेपाच तास चाललेल्या या चौकशी दरम्यान दीपिका अधिकाऱ्यांसमोर तीन वेळा रडल्याचं समजतंय. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला चांगलंच खडसावल्याचंही माहिती समोर आली आहे. रडून भावनिक दबाव आणू नये, असे एनसीबी अधिकाऱ्यांनी तिला सांगितले. 

दीपिकानं ड्रग्ज चॅट केल्याची कबुली दिली असून आपण ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं सांगितलं. त्याचसोबत व्हॉट्स अॅप चॅट खरे असल्याची कबुली दिली. एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. या चार अभिनेत्रींसोबतच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, सिमोन खंबाटा आणि जया साहा यांचेसुद्धा फोन्स जप्त करण्यात आले आहेत.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह, एकूण पाच अधिकाऱ्यांनी दीपिकाची चौकशी केली. या दरम्यान, एनसीबी गेस्ट हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दीपिका आणि मॅनेजर करिश्मा यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट

दीपिकाचं कोडनेम D आणि करिश्माचं कोडनेम K आहे. 

 • करिश्मा (K)आणि दीपिका (D) यांच्यातील २८ ऑक्टोबर २०१७ चं चॅट आहे. 
 • सकाळी १०.०३ वाजता, (+९१-९९२...) D नं लिहिलं की, K  तुझ्याकडे माल आहे का?
 • १०.०५ वाजता (+९१,९६१...) K नं लिहिलं की:  हो, पण घरी आहे, मी बांद्रामध्ये आहे.
 • १०.०५ वाजता K: जर तुम्हाला हवं असेल तर अमितला सांगू का?
 • १०.०७ वाजता D:  Yes!! Pllleeeeasssee
 • १०.०८  वाजता K : अमित जवळ आहे, तो आणत आहे.
 • १०.१२ वाजता D: Hash ना?
 • १०.१२ वाजता D: गांजा नाही
 • १०.१४ वाजता K: कोको जवळ तू कधी येणार आहेस?
 • १०.१५ वाजता D: साडेअकरा ते 12 दरम्यान.
 • १०.१५ वाजता D: शेल किती वाजता पोहोचेल?
 • K: मला असं वाटतं की त्यानं म्हटलं ११.३०. कारण त्याला १२ वाजता कुठे दुसरीकडे जायचं आहे.

Deepika Padukone broke down thrice during NCB interrogation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone broke down thrice during NCB interrogation