दीपिका लालबागच्या राजाच्या दर्शनाला अनवाणी जाण्याचे कारण काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी कलाकारांची हजेरी असते. यंदाही अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी दर्शन घेतले. त्यातच अभिनेत्री दीपिका पादुकोननेही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला बॉलिवूडसह राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावतात. बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिनेही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, मात्र ती अनवाणी आली होती. ती कोणत्या कारणाने अनवाणी दर्शनाला आली, याबाबत चर्चांना सुरवात झाली आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी कलाकारांची हजेरी असते. यंदाही अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी दर्शन घेतले. त्यातच अभिनेत्री दीपिका पादुकोननेही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. बाप्पाची पूजा केली. विशेष म्हणजे दीपिका यावेळी अनवाणी दर्शनास पोहोचली.

दीपिकाचा ट्रेडिशनल पेहरावही तितकाच आकर्षक होता. दीपिकाची ही बाप्पांबद्दलची भक्ती यावेळी आपल्याला पाहायला मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone prayers in Lalbaugcha Raja Mumbai