बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात दीपिका पदुकोणचं नाव, व्हॉट्सअॅप चॅट समोर

पूजा विचारे
Tuesday, 22 September 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर येत आहे. सोमवारी संध्याकाळी या प्रकरणात आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. ते नाव आहे अभिनेत्री दीपिका पदुकोणचं.

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर येत आहे. सोमवारी संध्याकाळी या प्रकरणात आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. ते नाव आहे अभिनेत्री दीपिका पदुकोणचं. या प्रकरणी दोन वृत्तवाहिन्यांनी तीन वर्षांपूर्वीचं चॅट उघड केला आहे. त्यामुळे या चॅटनुसार दीपिका पदुकोणचं सुद्धा ड्रग्स कनेक्शनमध्ये संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

एनसीबीनं या संबंधित दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. कारण दीपिकानं करिश्माच्या माध्यमातून हशीश ड्रग्स मागवले होते. दीपिका चॅटमध्ये हॅश (हशीश) ड्रग्स मागते आहे. तर समोरुन करिश्मा म्हणते की, हॅश नाही तर वीड आहे.  या चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. NCB च्या सुत्रांच्या माहितीनुसार D चा अर्थ दीपिका पादुकोण आणि K चा अर्थ करिश्मा 

दीपिकानं आपल्या मॅनेजरकडून मागवले होते ड्रग्स 

रिपोर्ट्सनुसार सांगितलं जात आहे की, ड्रग्स कनेक्शनची तपासणीसाठी एनसीबीच्या टीमनं दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि दीपिका दरम्यान एक चॅट रि स्टोर केलं आहे. यात दीपिका, करिश्माकडे ड्रग्सची मागणी करत आहे. यात अमित आणि शैल नावाच्या दोन लोकांचं नाव देखील आहे. मात्र अमित आणि शैल कोण आहे, याचा  खुलासा अद्याप झालेला नाही. 

या चॅटमध्ये दीपिकाचं कोडनेम D आणि करिश्माचं कोडनेम K आहे. 

करिश्मा (K)आणि दीपिका (D) यांच्यातील २८ ऑक्टोबर २०१७ चं चॅट आहे. 

 • सकाळी १०.०३ वाजता, (+९१-९९२...) D नं लिहिलं की, K  तुझ्याकडे माल आहे का?
 • १०.०५ वाजता (+९१,९६१...) K नं लिहिलं की:  हो, पण घरी आहे, मी बांद्रामध्ये आहे.
 • १०.०५ वाजता K: जर तुम्हाला हवं असेल तर अमितला सांगू का?
 • १०.०७ वाजता D:  Yes!! Pllleeeeasssee
 • १०.०८  वाजता K : अमित जवळ आहे, तो आणत आहे.
 • १०.१२ वाजता D: Hash ना?
 • १०.१२ वाजता D: गांजा नाही
 • १०.१४ वाजता K: कोको जवळ तू कधी येणार आहेस?
 • १०.१५ वाजता D: साडेअकरा ते 12 दरम्यान.
 • १०.१५ वाजता D: शेल किती वाजता पोहोचेल?
 • K: मला असं वाटतं की त्यानं म्हटलं ११.३०. कारण त्याला १२ वाजता कुठे दुसरीकडे जायचं आहे.

Deepika Padukone WhatsApp chats D In Drug Chat Asked K For Hash


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone WhatsApp chats D In Drug Chat Asked K For Hash